शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

पर्यायी रस्ताही चिखलात फसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 12:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोळदा ते खेतिया रस्त्याचे काम रखडल्याने पावसाळ्यात वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोळदा ते खेतिया रस्त्याचे काम रखडल्याने पावसाळ्यात वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. डामरखेडा ते लांबोळा दरम्यान पर्यायी रस्ताही सुस्थित नसल्याने चिखलात वाहने फसत आहेत. यामुळे  वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. रस्त्याचे काम करणा:या संबधीत ठेकेदाराला जिल्हाधिका:यांनी समज द्यावी अशी मागणी होत आहे. विसरवाडी-सेंधवा महामार्गाचे कोळदा ते खेतिया दरम्यानचे काम गेल्या अडीच वर्षापासून सुरू आहे. सध्या डामरखेडा ते लांबोळा र्पयतचा रस्ता खोदून ठेवण्यात आला आहे. त्या ठिकाणी पर्यायी रस्ता असला तरी त्यात मोठय़ा प्रमाणावर खड्डे पडले आहेत. संततधार पावसामुळे चिखलाचेही साम्राज्य निर्माण झाले आहे. परिणामी जड वाहने फसत असल्याने वाहतुकीचा वारंवार  खोळंबा होत आहे. ब:हाणपूर-अंकलेश्वर महामार्ग असल्यामुळे या रस्त्यावर जड वाहनांची मोठय़ा प्रमाणावर वर्दळ आहे. त्यातच पर्यायी रस्त्याची वाट लागल्याने दिवसातून अनेक वेळा वाहतूक खोळंबा होत आहे. परिणामी चारचाकी वाहन चालकांना मोठय़ा समस्येला सामोरे जावे लागत आहे. रात्रीच्या वेळी तर अनेक वाहने थेट खड्डयात पडत  आहेत. काही वाहनचालक पर्यायी मार्ग म्हणून प्रकाशाहून काथर्दा, तिखोरा मार्गे शहादा या रस्त्याचा वापर करीत आहेत. आधीच हा रस्ता सिंगल त्यात वाहनांचा मोठय़ा प्रमाणावर वापर वाढल्याने या रस्त्याची देखील वाट लागली आहे. या रस्त्यावरील गावकरी देखील हैराण झाले आहेत. या रस्त्यावरही वारंवार वाहतूक खोळंबा होत आहे.जिल्हाधिका:यांनी काम करणा:या संबधीत कंपनीच्या अधिका:यांना व ठेकेदारांना समज देवून पर्यायी रस्ता विस्तृत करावा तसेच कामाला गती देण्याच्या सुचना कराव्या अशी मागणी वाहन चालक तसेच या परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.