शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकार वेळकाढूपणाची भुमिका घेत असल्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 13:19 IST

 लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  केंद्र सरकार आंदोलकांच्या कायदे रद्द करण्याच्या मूळ मागणीला बगल देत वेळकाढूपणाची भूमिका घेते आहे ...

 लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  केंद्र सरकार आंदोलकांच्या कायदे रद्द करण्याच्या मूळ मागणीला बगल देत वेळकाढूपणाची भूमिका घेते आहे व शेतकऱ्यांच्या एकजुटीत फूट कशी पडेल या साठीच हा सारा खेळ करीत आहे हे स्पष्ट दिसतेय  आणि म्हणून चर्चेत सहभागी सर्व संघटनांनी हा प्रस्ताव नाकारला असल्याची माहिती लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांनी दिली. शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनात केंद्र सरकारने बुधवारी काही कायद्यांमध्ये बदल करण्यासंदर्भात प्रस्ताव ठेवला. परंतु तो प्रस्ताव निव्वल धुळफेक असल्याचे प्रतिभा शिंदे यांनी स्पष्ट केेले. या नव्या प्रस्तावात सरकारने जे बदल करण्या संदर्भात मुद्दे दिले आहेत ती तर शुद्ध धूळफेक आहे हे मुद्दे पुढील प्रमाणे एम एस पी ही कायम ठेवण्यात येईल. कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यात दुरुस्ती, शेतीमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी नोंदणी करणे राज्य सरकार ला वाटले तर ते करतील (केंद्र सरकार कायद्यात पक्की काही हस्तक्षेप करणार नाहीत), शेतकऱ्यांना कायद्यातील न्यायालयात जाण्याची मुभा.  खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर ही कर आकारणीची तरतूद राज्य सरकार ला हवे असेल तर ते कर लावू शकतात. बिजली संशोधन बिल मे किसान च्या आपत्ती चे समाधान केले जाईल (काय केलं जाईल ते आश्वासन नाही). करार कायद्यात शेतकऱयांची जमीन कंपनी हिरावू शकणार नाही. पराली जाळण्या संदर्भात प्रदूषण कायद्यातील शिक्षा संबधी विचार केला जाईल. हे कायद्यात प्रस्तावित बदल म्हणजे शेतकऱ्यांना वेड्यात काढण्या सारखेच आहे.  दिल्लीत लढणारे शेतकरी व त्यांच्या सर्व संघटनां एकजूट असून हे तिन्ही शेतकरी विरोधी कायदे पूर्ण रद्द करा या मागणीवर आम्ही ठाम आहेत आणि सरकारला हे कायदे रद्द करावेच लागतील या निर्धाराने हा लढा सुरूच राहील असा इशाराही दिला आहे.शेतकऱ्यांच्या ४० प्रतिनिधींसोबत चर्चा ठरलेली असतांना आदल्या रात्री गृहमंत्री अमित शहांना पुढे करत व शेतकरी आंदोलनात फूट टाकण्याचा अयशस्वी प्रयत्न केला गेला. त्यासाठी केंद्र सरकारने ८ तारखेच्या रात्री शेतकऱ्यांच्या १३ प्रतिनिधींना बैठकीला बोलावत एक कुटील डाव खेळण्यात आला. अर्थातच या बैठकीतूनही काही हाथी लागले नाही. म्हणून मग शेतकऱ्यांपुढे कायद्यात दुरुस्ती करण्याबाबतचा प्रस्ताव शेतकरी संघटनांपुढे ठेवला असल्याचेही प्रतिभा शिंदे यांनी म्हटले आहे.