शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
3
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
4
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
5
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
6
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
7
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
8
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
9
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
10
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
11
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
12
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
13
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
14
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
15
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
16
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
17
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
18
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
19
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
20
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

अक्कलकुव्यात सर्वच विभाग कोरोनावर मात करण्यासाठी घेताहेत कसोशीने मेहनत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 12:34 IST

अनिल जावरे । लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : तालुक्यात कोरोनाचा संसर्ग होवू नये यासाठी खापर आणि अक्कलकुवा याठिकाणी क्वारंटाईन ...

अनिल जावरे ।लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : तालुक्यात कोरोनाचा संसर्ग होवू नये यासाठी खापर आणि अक्कलकुवा याठिकाणी क्वारंटाईन कक्ष निर्माण करण्यात आले आहेत़ खापर येथील कक्षात आजवर ५३ जणांची असून यातील ४८ जण घरी सोडण्यात आले आहेत़ पाच जण अद्यापही येथील कक्षात आहेत़ अक्कलकुवा येथील कक्षात २५ पैकी दोघांना घरी पाठवण्यात आले असून येथे आता २३ जण आहेत़दोन्ही कक्ष तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ़ स्वप्नील मालखेडे यंच्या मार्गदर्शनात कार्यरत आहेत़ कक्षांमध्ये वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका आणि तंत्रज्ञ असे पथक तयार करुन सेवा देण्यात येत आहे़ कक्षात दाखल होणाऱ्यांमध्ये कोरोनाची लक्षणे नसल्याने त्यांच्यावर उपचार न करता त्यांच्यासोबत सामोपचाराचा संवाद ठेवण्यावर भर दिला जातो़ एका खोलीत जास्त वेळ राहून एकटेपणा येऊन नये म्हणून पथकांकडून सातत्याने त्यांच्यासोबत सोशल डिस्टन्सिंग ठेवत समुपदेशन केले जाते़ सर्वात प्रथम तालुक्यात खापर येथे कक्ष तयार करण्यात आला होता़ यानंतर अक्कलकुव्यात कोरोनाबाधित आढळून आल्यानंतर जवाहर नवोदय विद्यालयात नव्याने क्वारंटाईन कक्ष तयार करण्यात आला़दोन्ही कक्षामध्ये तालुक्यातील २५ वैद्यकीय अधिकारी, २९ एनएनएम, ११ प्रयोगशाळा तंत्रज्ञ अशा ६६ जणांची नियुक्ती करण्यात आली आहे़ दोन्ही कक्षांमध्ये डॉ़ हिंमत वळवी, डॉ़ स्वप्नील सूर्यवंशी, डॉ़ नितेश वसावे, डॉ़ सायसिंग वसावे, डॉ़ प्रदीप गोपाल, डॉ़ परदेशी, डॉ़बोळशेटे, डॉ़ रेखा नाईक, डॉ़ प्रमोद सोनवणे, डॉ़ योगेश पाटील, डॉ़ गणेश पाडवी यांचा समावेश आहे़दोन्ही कक्षांमध्ये तहसीलदार विजय कच्छवे, गटविकास अधिकारी सीक़े़माळी, पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे हे भेटी देऊन माहिती घेत आहे़ ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ़ गणेश पवार व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ़ मालखेडे हे दररोज सकाळी आरोग्य विभागाकडे कक्षाचा आढावा सादर करुन कामकाजाची माहिती देतात़ दोन्ही ठिकाणी क्वारंटाईन करण्यात आलेल्यांना नाश्ता, चहा आणि जेवणासह इतर भौतिक सुविधा देण्यात येत असल्याचे प्रत्यक्ष भेटी दरम्यान दिसून आले होते़