शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
2
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
3
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
4
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
5
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
6
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
7
Latest Marathi News LIVE Updates: भाजपाने मतदारसंघ पुनर्रचना केलेल्या अधिकाऱ्यांनाच नोकरीवर घेतले, रोहित पवारांचा आरोप
8
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
9
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
10
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
11
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
12
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
13
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
14
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
15
माजी क्रिकेटपटू, तृणमूल खासदार युसूफ पठाणचे सासरे आणि मेहुण्याला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई
16
अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना
17
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण
18
MHADA Lottery: गिरणी कामगारांच्या २,५२१ घरांच्या लॉटरीला विलंब लागण्याची चिन्हे 
19
जिनिलियाचं रितेशवरील प्रेम पाहून भारावली भाग्यश्री, 'राजा शिवाजी' सेटवरचा किस्सा सांगत म्हणाली...
20
उरणमधील नियोजित ८५० मेगावॅटचा प्रकल्प रखडला, केंद्राकडे गॅस पुरवठ्याचा प्रस्ताव धूळखात पडून
Daily Top 2Weekly Top 5

अक्कलकुवा ग्रामपंचायतीचा निकाल लांबल्याने चर्चांना उधाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:37 IST

अक्कलकुवा ग्रामपंचायतीत २०१६ ते २०२० या काळात चार कोटी रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याचे जिल्हा परिषदेने नियुक्त केलेल्या चाैकशी समितीकडून ...

अक्कलकुवा ग्रामपंचायतीत २०१६ ते २०२० या काळात चार कोटी रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याचे जिल्हा परिषदेने नियुक्त केलेल्या चाैकशी समितीकडून निष्पन्न झाले होते. चाैकशीनंतर विद्यमान सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक व प्रशासक यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्याचे आदेश जिल्हा परिषदेने दिले होते. या आदेशांच्या विरोधात विद्यमान सरपंच व उपसरपंच यांनी ग्रामविकासमंत्र्यांकडे अपील केले होते. या अपिलाची अंतिम सुनावणी २९ जून रोजी मंत्रालयात पार पडली. यावेळी ग्रामविकासमंत्र्यांनी गुन्हे दाखल करण्याबाबत देण्यात आलेली स्थगिती उठविण्यात यावी, असे स्पष्ट शब्दात सूचित केले होते. दरम्यान, याबाबत लेखी आदेश काढण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली होती. परंतु आठवडा उलटूनही कारवाई करण्यात आलेली नसल्याने पुढे काय होणार, याबाबत चर्चा रंगत आहे.

दरम्यान, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर राैंदळ यांना संपर्क केला असता, लेखी आदेशांची प्रतीक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेत अद्याप अप्राप्त असलेल्या आदेशांना विलंब होण्यास सुुरू असलेल्या अधिवेशनामुळे उशीर होत असल्याचेही कारण दिले जात आहे.

एकीकडे आदेशांची प्रतीक्षा असताना गैरव्यवहाराची निश्चित आकडेवारी समोर येण्यासाठी चार वर्षातील कामकाजाचे लेखापरीक्षणही होणार असल्याची माहिती दिली जात आहे. अक्कलकुवा ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहाराची चाैकशी करण्यासाठी नियुक्त समितीला दप्तरच उपलब्ध करून दिले जात नसल्याने निश्चित आकडा समोर येऊ शकला नव्हता. जिल्हा परिषदेने बँक तसेच इतर ठिकाणी देण्यात आलेल्या बिलांवरून चाैकशी करत गैरव्यवहाराची रक्कम निश्चित केली आहे. दरम्यान, फौजदारी कारवाई झाल्यास तपासानंतर मोठा आकडा समोर येण्याची शक्यताही सूत्रांकडून वर्तविण्यात आली आहे.