शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

अक्कलकुवा ग्रामपंचायतीने त्या गटारींचा निधी केला परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:21 IST

नंदुरबार : जिल्ह्यात सध्या चर्चेचा विषय असलेल्या अक्कलकुवा ग्रामपंचायती अंतर्गत गेल्या महिन्यात समोर आलेल्या गटारींच्या बांधकामाचा वाद होऊन बोगस ...

नंदुरबार : जिल्ह्यात सध्या चर्चेचा विषय असलेल्या अक्कलकुवा ग्रामपंचायती अंतर्गत गेल्या महिन्यात समोर आलेल्या गटारींच्या बांधकामाचा वाद होऊन बोगस बिले काढली जात असल्याचे पत्र ग्रामसेविकेने जिल्हा परिषदेला दिले होते. या पत्रामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती. दरम्यान ग्रामपंचायतीने लोकप्रतिनिधींकडून देण्यात आलेला १३ लाख रुपयांचा गटारी बांधकामाचा निधीच ग्रामपंचायतीने जिल्हा परिषदेकडे परत केला असून बांधकाम केलेल्या गटारींचे काय, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

अक्कलकुवा ग्रामपंचायतींतर्गत भगवा चाैक, हनुमान मंदिर, झेंडा चाैक याठिकाणी गटारींचे काम गेल्या दोन वर्षांपूर्वी पूर्ण करण्यात आले होते. लोकप्रतिनिधींच्या निधीतून या कामाला मंजुरी देण्यात आली होती. दरम्यान या कामांचे बोगस बिल ग्रामपंचायतीच्या नावाने तयार करण्यात आल्याचा प्रकार होत असल्याची लेखी तक्रार जिल्हा परिषदेकडे तत्कालीन ग्रामसेविकेने दिली होती. या तक्रारीत कनिष्ठ अभियंत्यांकडून बिल तयार करण्यात येत असल्याचे म्हटले होते. यामुळे प्रशासकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. या कामासाठी शासनाकडून ५५ टक्के बिलाची रक्कम मंजूर करून देण्यात आली होती. एकूण १३ लाख ४० हजार ३१२ रुपयांच्या या निधीचा धनादेश ग्रामपंचायतीकडून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना परत देण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. यातून ग्रामपंचायतीने ही कामे केलीच नसल्याचे सांगून निधी परत केला असून गावातील भगवा चाैक, शिवनेरी चाैक याठिकाणी पेव्हर ब्लाॅक व सिमेंट काँक्रीटचा रस्ता तयार करण्यासाठी निधी द्यावा, अशी मागणी केली आहे.

ग्रामसेविकेने १४ जून रोजी सोडला होता पदभार

अक्कलकुवा ग्रामपंचायतीकडून १६ जून रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांना पत्र देऊन धनादेश परत करण्यात आल्याची माहिती आहे. परंतु ग्रामसेविका आर.ए.पाडवी यांनी १४ जून रोजी सर्व दप्तर सरपंच यांच्या ताब्यात देत पदभार सोडला होता.यामुळे १५ रोजीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या पत्रावर त्यांची सही कशी असा प्रश्न निर्माण होत आहे.

ग्रामपंचायतीकडून निधी परत करण्यात आला असल्याने हा जिल्हा परिषदेत काम पूर्ण झाल्याचे बिल सादर केले कोणी असा प्रश्न आहे. ग्रामपंचायत हद्दीत काम झाले असल्याने ग्रामपंचायतीने काम पूर्ण होईपर्यंत लक्ष का दिले नसावे अशीही विचारणा होत आहे.

ग्रामपंचायतीवर सध्या ग्रामविकास अधिकारी म्हणून रवींद्र वळवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीनंतरही त्यांना पूर्ण दप्तर देण्यात आलेले नसल्याची माहिती समोर आली आहे.