शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

अजितदादा, स्ट्रॉबेरीचे ‘चॉकलेट’ होऊ देऊ नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:29 IST

सातपुड्यातील तोरणमाळ व डाब हे ठिकाण थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. येथील वातावरणाचा अभ्यास करून कृषी विभागाने सात-आठ ...

सातपुड्यातील तोरणमाळ व डाब हे ठिकाण थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. येथील वातावरणाचा अभ्यास करून कृषी विभागाने सात-आठ वर्षापूर्वी या भागातही स्ट्रॉबेरीचे उत्पादन होऊ शकते काय? यादृष्टीने प्रायोगिक तत्त्वावर प्रयोग राबविले होते. तेव्हा डाब आणि तोरणमाळ येथील एका शेतकऱ्याने काही गुंठे क्षेत्रात स्ट्रॉबेरीची लागवड केली. स्ट्रॉबेरीचे उत्पादन सुरू झाले, पण सुरुवातीला ती काढावी कशी आणि त्याची विक्री कशा पद्धतीने करावी यासंदर्भात फारशी माहिती नसल्याने पहिल्या वर्षी हौसेखातर शेतकऱ्यांनी समाधान मानून घेतले. पुढे त्यापासून प्रेरणा घेत अजून काही शेतकरी पुढे आले. गेल्या सात-आठ वर्षात आता स्ट्रॉबेरीचे क्षेत्र गुंठ्यांवरुन एकरमध्ये गेले आहे. यावर्षीदेखील सुमारे ३० शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीची लागवड केली असून अनुभवातून आता उत्तम प्रतीचे उत्पादन सुरू झाले आहे. येथील स्ट्रॉबेरीची चव खरोखरच उत्कृष्ट असून महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीपेक्षा ती वरचढ ठरली आहे. त्यामुळे या स्ट्रॉबेरीला जिल्ह्याची नवीन ओळख देण्याच्या दृष्टीने पालकमंत्री ॲड.के.सी. पाडवी व जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी नाशिक येथील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीचे निमित्त साधत त्यांना भेट देण्याचे नियोजन केले. उपमुख्यमंत्र्यांनीही ही भेट मोठ्या कौतुकाने स्वीकारली आणि स्ट्रॉबेरीच्या चवीचा गोडवाही सांगितला. या भेटीच्या निमित्तानेच जिल्हा प्रशासनाने तोरणमाळ व स्ट्रॉबेरीचा विकासाचा ५० कोटीचा आराखडाही दिला. त्याला मंजुरी देण्याचे संकेत उपमुख्यमंत्र्यांनी दिले. नव्हे तर प्रोत्साहन देण्यासाठी योजना तयार करण्याच्याही सूचना दिल्या. त्यामुळे यानिमित्ताने गेल्या वर्षानुवर्षापासून रखडलेले तोरणमाळ विकासाचे स्वप्न साकारता येईल, अशी आस आता जिल्हावासीयांना लागली आहे. त्याचबरोबर सातपुड्यातील डोंगराळ शेतीचा विकासाचा आराखडा तयार होऊन वर्षानुवर्षे अतिक्रमीत डोंगराळ, खडकाळ शेतीवर राबराब राबून दोनवेळच्या पोटाची खळगी भरण्याइतकेही उत्पन्न न मिळू शकणाऱ्या शेतकऱ्यांच्या समृद्धीचा मार्गही सुकर होईल, अशीही अपेक्षा लागून आहे. अतिक्रमित जमिनी आता शेतकऱ्यांच्या मालकीची करण्याची प्रक्रियाही सुरू झाली असून सुदैवाने राज्याचे आदिवासी विकासमंत्रीपद याच भागातील सुपुत्र ॲड.के.सी. पाडवी यांच्याकडे आहे. त्यामुळे हा योग चांगला मानला जात आहे. साहजिकच आशा-अपेक्षांची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. अर्थातच सातपुड्यातील जनतेच्या व परिसराच्या विकासासाठी आजवर अनेक योजनांची घोषणा झाली, आश्वासने मिळाली परंतु प्रत्यक्षात अपेक्षित विकासाचे फळ अद्यापही या भागातील जनतेला चाखायला मिळालेले नाही. आता स्ट्रॉबेरीच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा नवीन आस जागृत केली आहे. त्यामुळे आता स्ट्रॉबेरी विकासाचा आराखडा ‘चॉकलेट’ दाखवल्यासारखे होऊ नये हीच अपेक्षा.