लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत डीजे व मोठ्या आवाजाचे स्पिकर लावल्याप्रकरणी पुन्हा तीन मंडळांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी सहा मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.शिवजयंतीनिमित्त नंदुरबारात अनेक मंडळ व तालीम संघांनी मिरवणुका काढल्या होत्या. त्यात डीजे व उच्च आवाज क्षमतेचे स्पिकर लावले होते. त्यांचा आवाज ध्वनी प्रदुषण अधिनियमातील तरतुदीपेक्षा अधीक असल्याने पोलिसांनी समज दिली. पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशीही हुज्जत घातली. याप्रकरणी पोलीस जमादार मगन रामसिंग गावीत यांनी फिर्याद दिल्याने छत्रपती संभाजी व्यायामशाळेचे अध्यक्ष धनराज गंगाराम पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ध्वनी मर्यादेची तपासणी केली असता त्यात मर्यादेपेक्षा अधीक ध्वनी नोंदविला गेला. हवालदार संदीप गोसावी यांच्या फिर्यादीवरून माळी समाज सावता फुले मंडळाचे अध्यक्ष आनंदा बाबुराव माळी यांच्या विरुद्ध आणि फौजदार प्रविण महाले यांच्या फिर्यादीवरून शक्ती सागर व्यायाम शाळा मंडळाचे अध्यक्ष अर्जून रामदास मराठे यांच्याविरुद्ध नंदुरबार शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
पुन्हा तीन मंडळांविरुद्ध ध्वनीक्षेपकाचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 12:03 IST
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत डीजे व मोठ्या आवाजाचे स्पिकर लावल्याप्रकरणी पुन्हा तीन मंडळांविरुद्ध गुन्हा ...
पुन्हा तीन मंडळांविरुद्ध ध्वनीक्षेपकाचा गुन्हा
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}