शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

निकालानंतर विजयी अन् पराभूतांना ऑनलाईन खर्च सादरीकरणाचा जाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 14:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : ग्रामपंचायत निवडणुकीत निवडणूक आयोगाने यंदा पारंपरिक (ऑफलाईन) खर्च सादर करण्याच्या पद्धतीला फाटा देऊन उमेदवारांना ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : ग्रामपंचायत निवडणुकीत निवडणूक आयोगाने यंदा पारंपरिक (ऑफलाईन) खर्च सादर करण्याच्या पद्धतीला फाटा देऊन उमेदवारांना ऑनलाइन खर्च सादर करण्यासाठी ॲप विकसित केले आहे. उमेदवारांसाठी ते डोकेदुखी ठरत असून अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे निवडणूक खर्च ऑफलाईन स्वीकारावा अशी मागणी होत आहे.आधीच ऑनलाइन अर्जाच्या ससेमिऱ्याने वैतागलेल्या उमेदवारांना आता ऑनलाइन खर्च सादर करताना डोकेदुखी ठरत आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मोबाईलमध्ये ऑनलाईन ट्रू वोटर ॲप डाऊनलोड करून त्यात खर्च सादर करावा लागत आहे. जिल्ह्याची परिस्थिती पाहता ऑनलाइन खर्च सादर करणे म्हणजे उमेदवारांसाठी तारेवरची कसरत आहे. निवडणुकीत उभे असलेल्या काही उमेदवारांकडे अँड्रॉइड मोबाईल नाही तसेच आयोगाचे हे ॲप नवीन वर्जनच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड होत आहे.या आहेत अडचणीट्रू वोटर ॲप हे एका मोबाईलवर इन्स्टॉल केल्यानंतर दुसऱ्या मोबाईलवर उमेदवाराचा नंबर वापरून करता येणार नाही. कारण फक्त एकाच मोबाईलचा नोंदणी क्रमांक एका व्यक्तीकरिता करण्याची व्यवस्था आहे. शिवाय मोबाईलमध्ये भरपूर स्पेस असणे आवश्यक आहे. हे ॲप इन्स्टॉल करण्याअगोदर संबंधित उमेदवाराने ऑनलाइन नामनिर्देशन अर्ज भरलेला असणे आवश्यक आहे. प्रत्येक उमेदवाराला त्याच्या अँड्रॉइड मोबाईलवर हे ॲप इन्स्टॉल करून त्यात खर्च भरावा लागणार आहे. दरम्यान ऑनलाइन नामनिर्देशन अर्ज भरताना वेबसाइट हँग होणे, हँग होणे या समस्या जाणवल्या. त्यामुळे आयोगाने अखेरच्या दिवशी ऑफलाईन अर्ज स्वीकारले. आता ज्या उमेदवारांनी ऑनलाईन नॉमिनेशन दाखल केले नाही त्यांनी काय करावे हा प्रश्न उपस्थित होत आहे.उमेदवारांपुढे प्रश्नचिन्हउमेदवार सातवी पास असले तरी काही उमेदवारांची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल नाही. शिवाय त्यांना त्यातले एवढे ज्ञान नसल्याने खर्च कसा सादर करायचा या विवंचनेत उमेदवार आहेत. जिल्ह्याची परिस्थिती पाहता काही भाग अतिदुर्गम भागात मोडतो त्यामुळे त्या ठिकाणी रेंज नसल्याने अवघड होत आहे.   मोबाईलचा वापर कमी 

  •  या निवडणूकीत एकूण १ हजार २२९ उमेदवारांनी उमेदवारी केली आहे. यातील ५३० सदस्य निवडून आले आहेत. सुमारे १ हजारपेक्षा अधिक असलेल्या या उमेदवारांनी ॲप डाऊनलोड केले असले तरीही ते भरावे कसे याची माहिती नसल्याने अडचणी येत आहेत. 
  •  अनेक ठिकाणी नेटर्वक नसल्याने उमेदवारांना माहिती भरणेही अवघड ठरत आहे. 

   दुर्गम भागात अडचणीदुर्गम भागात गेल्या काही वर्षात मोबाईचा वापर वाढला असला तरी टूजी आणि थ्रीजी नेटर्वकही योग्य त्या प्रकारे चालत नसल्याने समस्या निर्माण होत आहे. यातून उमेदवारी अर्ज दाखल करताना अनेकांना अडचणी आल्या होत्या. यामुळे आता निवडणूक खर्च कसा भरावा याबाबत विजयी आणि पराभूत उमेदवारांची घालमेल सुरु झाली आहे. 

प्रशासनाने यातून सूट द्यावी 

ऑनलाईन अर्ज भरण्यास अडचणी आल्याने शेवटच्या दिवशी ऑफलाईन पद्धतीने अर्जांचा भरणा करण्यात आला होता. याच प्रकारे प्रशासनाने खर्च सादर करण्यासंदर्भात मुभा द्यावी अशी मागणी ग्रामीण भागातून होत आहे. 

निवडणूक आयोगाने पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीने निवडणूक खर्च सादर करण्यास परवानगी द्यावी. निदान खर्च सादर करतांना तरी ऑनलाइनचा ससेमिरा मागे घ्यावा. बहुतांश महिला व पुरुष कमी शिक्षित असल्याने ऑनलाइन खर्च टाकण्यास हे अवघड ठरणार आहे. ऑनलाइन खर्च सादर करणे डोकेदुखी ठरत आहे.  -प्रमिला सुभाष पाटील, उमेदवारसोनवद त.श,ता. शहादा.