शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

सातपुड्यात सेंद्रिय शेतीचा अवलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 13:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : कृषी जागृतीसाठी खेड्याकडे चला या केंद्र शासनाच्या अभियानांतर्गत सातपुड्यातील शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीचा अवलंब केला ...

लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : कृषी जागृतीसाठी खेड्याकडे चला या केंद्र शासनाच्या अभियानांतर्गत सातपुड्यातील शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीचा अवलंब केला आहे. त्यात तीन गावांमधील १० शेतकऱ्यांनी पॉलीहाऊसद्वारे या शेती पद्धतीला सुरुवात केली आहे. याशिवाय अनेक शेतकºयांनाही याबाबत मार्गदर्शन केले जात असून या पद्धतीचा अवलंब करणाºयांमध्ये भर पडण्याची शक्यता आहे.नंदुरबार जिल्ह्यात सेंद्रिय शेतीतून अन्नधान्य व भाजीपालाचे उत्पादन वाढावे म्हणून जिल्ह्यात जेल्वे फॉऊंडेशनमार्फत शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. तसेच या शेती पद्धतीचे होणारे फायदे देखील स्पष्ट करुन दिले जात आहे. सेंद्रिय शेतीला मार्गदर्शक राजेंद्र वसावे यांनी प्रथम सातपुड्याच्या कुशीतील वाड्या वस्त्यांपासून सुरुवात केली. वसावे यांच्या चळवळीला सातपुड्यातील शेतकºयांकडून चांगला प्रतिसाद लाभत आहे. या पद्धतीचा अवलंब केला जात असून प्रत्यक्ष अन्नधान्य व भाजीपाल्याचे उत्पादनच घेत आहे. त्यात बेडाकुंड ता.अक्कलकुवा येथील शेतकरी मिठ्या वळवी, सुपा वळवी यांच्यासह चार शेतकºयांनी याचा अवलंब केला आहे. तर जमाना येथील भरत पाडवी यांच्यासह सहा शेतकºयांनी पॉलीहाऊस निर्माण केले आहे. तर पोहरा येथील रतिलाल तडवी यानेही पॉलीहाऊस तयार करीत भाजीपाल्याची लागवड केली आहे.या शेतकºयांनी पुढाकार घेतल्यानंतर अनेक शेतकरी याकडे वळत आहे. शासनाकडून पॉलीहाऊससाठी अनुदान मिळविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. त्यातून त्यांनी पॉलिहाऊस तयार करून त्यामध्ये सेंद्रिय भाजीपाल्याचे उत्पादन घेतले. यातून उत्पादित भाज्यांची माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांना देण्यात आली. दरम्यान या शेती पद्धतीचे जिल्हाधिकारी डॉ. भारूड यांनी मार्गदर्शक वसावे यांचे कौतुक केले. दरम्यान सातपुड्यातील शेतकºयांना सेंद्रिय शेतीचा अवलंब करण्याचे करण्यासाठी डॉ.भारुड यांनी वसावे यांची पाठ थोपाटली.सेंद्रिय शेतीत महाराष्ट्रातील वाशिम जिल्हा आघाडीवर असून दुसºया क्रमांकावर नंदुरबार जिल्हा असल्याचे राजेंद्र वसावे यांनी सांगितले. सेंद्रिय शेतीमुळे मानवी आरोग्यासह पर्यावरणाचे समतोल ठेवण्यासाठीही सहकार्य होत आहे. शिवाय पशू पक्ष्यांच्या आरोग्यासाठीही ही शेती पद्धत उपायकारक असल्याचे म्हटले जात आहे.

 

 

सातपुड्यातील शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीबाबत मार्गदर्शन करणारे राजेंद्र वसावे यांचा जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांचा हस्ते सत्कार करण्यात आला. दरम्यान सेंद्रिय शेतीबाबत नंदुरबार जिल्हा दुसºया क्रमांकावर येणार असल्याची माहिती देखील देण्यात आली.