मंदाणे, लोणखेडासह आठ ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:30 IST2021-07-29T04:30:40+5:302021-07-29T04:30:40+5:30

राज्यात कोरोना महामारीचे मोठे संकट आल्याने कोरोना संक्रमणाचा धोका लक्षात घेता उद्भवलेली आरोग्यविषयक सद्य:परिस्थिती विचारात घेऊन जुलै ते ऑगस्ट ...

Administrators appointed in eight gram panchayats including Mandane and Lonkheda | मंदाणे, लोणखेडासह आठ ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त

मंदाणे, लोणखेडासह आठ ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त

राज्यात कोरोना महामारीचे मोठे संकट आल्याने कोरोना संक्रमणाचा धोका लक्षात घेता उद्भवलेली आरोग्यविषयक सद्य:परिस्थिती विचारात घेऊन जुलै ते ऑगस्ट २०२१ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका मुदत समाप्तीपूर्वी घेणे अशक्य झाले. त्यामुळे मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्याची कार्यवाही प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तसे आदेश नुकतेच काढले आहेत. त्यात शहादा तालुक्यातील मंदाणे (२२ जुलै) ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून ग्रामपंचायत विस्तार अधिकारी एस. झेड. देवरे, लोणखेडा (२१ जुलै) येथे ग्रामपंचायत विस्तार अधिकारी बी. एस. सूर्यवंशी, रायखेड (२१ जुलै) येथे ग्रामपंचायत विस्तार अधिकारी डी. बी. बेलदार, लंगडी भवानी (२१ जुलै) येथे कृषी विस्तार अधिकारी एम. आर.देव, वैजाली (२१ जुलै) येथे ग्रामपंचायत विस्तार अधिकारी बी. एफ. निकुंभ, शहाणे (२१ जुलै) येथे शिक्षण विस्तार अधिकारी एस. एस. तावडे, होळ उंटावद (२१ जुलै) येथे शिक्षण विस्तार अधिकारी डी. टी. वळवी, सुलवाडे (१९ जुलै) येथे शिक्षण विस्तार अधिकारी सी. एस. निकम यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Web Title: Administrators appointed in eight gram panchayats including Mandane and Lonkheda