शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

शहादा तालुक्यात जिल्हा परिषद पोटनिवडणुकीची प्रशासकीय तयारी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:21 IST

येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार होऊ घातलेल्या निवडणुकीविषयी माहिती दिली. त्यानुसार ...

येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार होऊ घातलेल्या निवडणुकीविषयी माहिती दिली. त्यानुसार इच्छुक उमेदवारांना प्रथम ऑनलाइन अर्ज सादर करावा लागणार आहे. या पोटनिवडणुकीत विविध राजकीय पक्षांनी प्रचारादरम्यान आधुनिक साधनांचा वापर करावा, गर्दी टाळण्याचा प्रयत्न करावा, यासोबतच विविध बाबींच्या परवानगीसाठी तहसील कार्यालयात एक खिडकी योजना कार्यान्वित करण्यात आली असून, त्या ठिकाणी विविध परवानग्या मिळतील. विनाविलंब परवानगी मिळावी, यासाठी प्रयत्न आहे. त्याचबरोबर आचारसंहिता पथकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.

तालुक्यात १८६ केंद्र

या पोटनिवडणुकीत चार गट व आठ गणात एकूण एक लाख १७ हजार ४०७ मतदार असून, १८६ मतदान केंद्रे आहेत. कोरोनामुळे मतदान केंद्रावर मतदार संख्या प्रत्येकी ८०० एवढी मर्यादित करण्यात आली आहे. यापूर्वी एका केंद्रावर १ हजार २०० मतदार एका केंद्रावर मतदान करत होते. परंतु कोरोनामुळे सोशल डिस्टन्सिंग व गर्दी टाळण्यासाठी मतदान केंद्रावरील मतदारांची संख्या मर्यादित करण्यात आली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर सहा कर्मचारी याप्रमाणे १८६ केंद्रांवर एकूण ९३० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे १८६ मतदान यंत्र कार्यान्वित राहणार आहेत. दरम्यान, ८ जुलैला मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पहिला प्रशिक्षण वर्ग येथील चावरा इंग्लिश स्कूलला आयोजित करण्यात येणार आहे.

निवडणूक कार्यक्रम असा

न्यायालयाच्या निर्णयानुसार निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार २९ जून ते ५ जुलैपर्यंत सुटी सोडून सकाळी ११ ते दुपारी तीन या वेळेत नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येणार आहेत. ६ जुलैला छाननी, त्याचदिवशी छाननीनंतर लगेच वैध उमेदवारांची यादी गट व गणनिहाय प्रसिद्ध होणार आहे. अपील दाखल करण्याची शेवटची तारीख ९ जुलै असून, १२ जुलैला अपिलावर सुनावणी आहे. अपील नाही तेथे १२ जुलैपर्यंत माघार व अपील आहे त्याठिकाणी १४ जुलैपर्यंत माघारीची सकाळी ११ ते दुपारी तीनपर्यंत मुदत असणार आहे. जेथे अपील नाही त्या ठिकाणी १२ जुलैला साडेतीन वाजल्यानंतर निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करून निशाणी वाटप होणार आहे. ज्या ठिकाणी अपील आहे त्या ठिकाणी १४ जुलैला निशाणी वाटप होणार आहे. १९ जुलैला सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदानाची प्रक्रिया होईल. २० जुलैला मतमोजणी होणार आहे.