शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
2
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
3
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
4
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
5
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
6
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
7
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
8
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
9
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
10
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
11
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
12
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
13
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
14
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
18
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
19
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
20
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ विद्यार्थ्यांबाबत प्रशासन अनभिज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 11:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अक्कलकुवाहून बिहारला गेलेले तीन विद्यार्थी कोरोनाबाधीत असल्याचे अहवाल सहरसा (बिहार) येथील प्रशासनाला प्राप्त झाले. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अक्कलकुवाहून बिहारला गेलेले तीन विद्यार्थी कोरोनाबाधीत असल्याचे अहवाल सहरसा (बिहार) येथील प्रशासनाला प्राप्त झाले. दरम्यान, जामिया इन्स्टीट्यूटने आमच्याकडून योग्य ती तपासणी झाल्याचा दावा करून इतर अफवा निराधार असल्याचे म्हटले आहे.चार दिवसांपूर्वी विशेष रेल्वेने अक्कलकुवा येथील अनेक विद्यार्थी तसेच उत्तर भारतीय नागरिकांना नंदुरबारहून रवाना करण्यात आले होते. त्यापूर्वी या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी झाल्याचे सांगितले गेले होते. तरीही बिहारमध्ये जाताच या विद्यार्थ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह कसा आला याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. प्रशासनाला याबाबत मात्र माहिती नसल्याचे सांगण्यात आले. रेल्वेने गेलेल्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यासाठी रेल्वे स्थानकात लोकप्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते. या तीन विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण नेमकी कुठे झाली याचाही शोध घेणे आवश्यक आहे.नंदुरबारहून गेलेले विद्यार्थी बिहारमध्ये कोरोना पॉझिटिव्ह निघत असतील ती बाब गंभीर मानावी लागणार आहे. नंदुरबार ते सहरसा हा दोन दिवसांचा प्रवास होता. या प्रवासात विद्यार्थ्यांना सोशल डिस्टन्सिंगसाठी सुचना देण्यात आल्या होत्या. तशी बैठक व्यवस्था देखील होती. सहरसाचे जिल्हाधिकारी कौशल कुमार यांनी १३ वर्षीय दोन तर १८ वर्षीय एक विद्यार्थी असल्याचे सांगितले आहे. या विद्यार्थ्यांच्या सोबत इतर विद्यार्थ्यांचेही स्वॅब घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता स्थानिक स्तरावरच्या एकुणच तपासणीबाबत आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत.दरम्यान, जामिया इस्लामिया इशातूल उलूम संस्थेने विद्यार्थ्यांची योग्य काळजी घेतली. वेळोवेळी शासकीय वैद्यकीय तपासणी केल्याचे म्हटले आहे. उठणाऱ्या वावड्या व अफवा निराधार असल्याचे पत्रकात म्हटले आहे.