अ‍ॅक्टीव्ह नगरसेवकांनी केली प्रभागातील नागरिकांना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 13:01 IST2020-08-28T13:01:48+5:302020-08-28T13:01:56+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाकाळात जिल्ह्यातील चारही पालिकेतील अनेक नगरसेवकांनी विविध माध्यमातून आपल्या प्रभागातील जनतेला मदत करण्याचा प्रयत्न ...

Active corporators help the citizens of the ward | अ‍ॅक्टीव्ह नगरसेवकांनी केली प्रभागातील नागरिकांना मदत

अ‍ॅक्टीव्ह नगरसेवकांनी केली प्रभागातील नागरिकांना मदत

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनाकाळात जिल्ह्यातील चारही पालिकेतील अनेक नगरसेवकांनी विविध माध्यमातून आपल्या प्रभागातील जनतेला मदत करण्याचा प्रयत्न केला. काही ठिकाणी मात्र नगरसेवकांनी तोंडही दाखविले नसल्याच्या प्रतिक्रिया देखील आहेत.
कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यातील चारही नगरपालिकांमधील सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांनी आपल्या परीने विविध माध्यमातून मदत केली.
लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात नंदुरबारातील अनेक सत्ताधारी आणि विरोधी गटातील नगरसेवकांनी नागरिकांना मास्क वाटप केले. गरीब व गरजू कुटूंबांना विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून किराणा किट वाटप केल्या. मोफत अन्नदान छत्र देखील सुरू करण्यात आले होते. आपल्या प्रभागात पाणी पुरवठा वेळेवर व्हावा, स्वच्छता वेळेवर व्हावी यासाठी नगरसेवकांनी स्वत:हून पुढाकार घेत नियमित या सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. प्रभागात पालिकेतर्फे जंतूनाशक फवारणी करून घेण्यासाठी देखील असे नगरसेवक आग्रही होते.
एका प्रभागातून तीन नगरसेवकांपैकी एक किंवा दोनच या काळात अ‍ॅक्टीव्ह होते. काही ठिकाणी तिन्हीजण अ‍ॅक्टीव्ह असल्याचेही चित्र होते. आरोग्य सेवा वेळेवर उपलब्ध व्हावी यासाठी देखील अनेकांनी प्रयत्न केले.
नंदुरबार, शहादा या शहरात सुरुवातीच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव होता. त्यामुळे या दोन्ही शहरातील नगरसेवकांनी आपल्या परीने जास्तीत जास्त आपल्या प्रभागात सेवा देण्याचा प्रयत्न केला.
त्या त्या पालिकांच्या सर्वसाधारण व विषय समितींच्या सभांमध्ये याबाबत नगरसेवक पोटतिकडीने आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा याबाबत प्रश्न उपस्थित करून ते सोडवून घेत होते.
जून महिन्यापासून लॉकडाऊन टप्प्या टप्प्याने उठविण्यात आल्यानंतर मात्र व्यवहार सर्वसामान्य होत गेले, परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने आरोग्य सेवेसाठी नगरसेवकांना आपल्या प्रभागातील नागरिक कधीही हक्काने हाक देत असल्याचे चित्र आहे.


निष्क्रिीय नगरसेवकांबाबत मात्र या काळात त्या त्या प्रभागातील नागरिकांच्या तीव्र भावना दिसून आल्या. अनेक जणांनी या काळात नागरिकांना तोंड देखील दाखविले नसल्याचे चित्र होते. संकट काळात कामी न येणाऱ्या अशा नगरसेवकांबाबत तीव्र नाराजीचही भावना दिसून आली.

Web Title: Active corporators help the citizens of the ward