भाजी विक्रेत्यांवर तळोद्यात कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 12:29 IST2020-04-30T12:29:37+5:302020-04-30T12:29:44+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : तोंडाला मास्क न लावता भाजीपाला विकून सोशल डिस्टन्सिंगची पायमल्ली करणाऱ्या तळोद्यातील तीन भाजी विक्रेत्यांवर ...

Action against vegetable sellers at the bottom | भाजी विक्रेत्यांवर तळोद्यात कारवाई

भाजी विक्रेत्यांवर तळोद्यात कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : तोंडाला मास्क न लावता भाजीपाला विकून सोशल डिस्टन्सिंगची पायमल्ली करणाऱ्या तळोद्यातील तीन भाजी विक्रेत्यांवर बुधवारी पालिका प्रशासनाने प्रथमच दंडात्मक कारवाई केल्यामुळे भाजी विक्रेत्यांमध्ळे प्रचंड खळबळ उडाली आहे. व्यासायिकांनी मास्क व डिस्टन्सिंगचे नियम पाळण्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे.
कोरोना या महामारीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नगरपालिकेने शहरातील भाजी व फळ विक्रेते गणपती मंदिर, विमल नगर, जोशीनगर, कचरा डेपो समोरील जागा, विद्यानगरी, प्रतापनगर, अशा वेगवेगळ्या आठ ठिकाणी स्थलांतर केले आहे. साहजिकच यामुळे सातत्याने भाजीमार्केटमध्ये होणाºया गर्दीस आळा बसला आहे. पालिकेच्या मुख्याधिकारी सपना वसावे, प्रशासकीय अधिकारी विजय सोनवणे, आरोग्य निरीक्षक डिगंबर माळी, राजेंद्र माळी यांनी बुधवारी सकाळी या सर्व भागामध्ये जावून पाहणी केली. गणपती मंदिर जवळील तीन भाजी विक्रेत्यांनी तोंडाला मास्क लावलेला नव्हता. याशिवाय तेथे गर्दीदेखील करण्यात आली होती. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचीही पायमल्ली करण्यात आली होती.
साहजिकच या विक्रेत्यांनी शासनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याने त्यांना प्रत्येकी ५०० रुपये या प्रमाणे १५०० रूपयांची दंडात्मक कारवाई केली आहे. पालिका प्रशासनाने प्रथमच मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई केल्यामुळे भाजी व फळ विक्रेत्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. तथापि पालिकेने यात सातत्य राखण्याची अपेक्षा केली जात आहे. तरच विक्रेत्यांवर वचक राखता येईल.

गर्दी टाळण्यासाठी भाजी विक्रेत्यांना शहरातील वेगवेगळ्या आठ जागा निश्चित केल्या असल्या तरी प्रतापनगर, जोशीनगर या ठिकाणी भाजी विक्रेते भाजी विक्रीस उभे राहत नाही. त्यामुळे नाईलाजास्तव वसाहतीतील रहिवाशांना इतर ठिकाणी गर्दी करावी लागत आहे. पालिकेने ज्या भाजी विक्रेत्यांची नेमणूक केली होती त्यांना त्या ठिकाणी भाजीपाला विक्री बाबत कडक समज द्यावी, दरम्यान येथील कृषी विभागानेदीखल घरपोच भाजीपाला देण्याची व्यवस्था केली होती. तथापि नेमून दिलेला शेतकरी गट एकच दिवस वसाहतीत आला. त्यानंतर आलाच नाही. त्यामुळे प्रशासनाने दखल घेण्याची मागणी आहे.

Web Title: Action against vegetable sellers at the bottom