तळोद्यात अवैधपणे वृक्षतोड करणाऱ्यावर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:29 AM2021-01-18T04:29:03+5:302021-01-18T04:29:03+5:30

तळोदा पालिका हद्दीतील पालिकेने शहरातील हातोडा रोड व चिनोदा रस्त्याचे रुंदीकरण, रस्ता दुभाजकाचे काम हाती घेतले आहे. साहजिकच या ...

Action against illegal loggers in Talodya | तळोद्यात अवैधपणे वृक्षतोड करणाऱ्यावर कारवाई

तळोद्यात अवैधपणे वृक्षतोड करणाऱ्यावर कारवाई

Next

तळोदा पालिका हद्दीतील पालिकेने शहरातील हातोडा रोड व चिनोदा रस्त्याचे रुंदीकरण, रस्ता दुभाजकाचे काम हाती घेतले आहे. साहजिकच या रस्त्याच्या कामासाठी अडथळा ठरणारे वृक्ष काढण्याची परवानगी संबंधित व्यापाऱ्यास देण्यात आली आहे. पालिका प्रशासनाने चिनोदा रस्त्यावरील १८ झाडे व हातोडा रस्त्यावरील एक झाड असे एकूण १९ झाडे तोडण्याची परवानगी देण्यात आली होती. ही परवानगी गेल्यावर्षी ६ ऑगस्ट २०२० रोजी देण्यात आली होती. असे असताना त्या परवानगीच्या नावावर हातोडा रस्त्यावरील इतर वृक्षांची तोड त्याने सुरूच ठेवली होती. याबाबत शिवसेनेचे पदाधिकारी जितेंद्र दुबे यांनी त्यास विचारणा केली होती. त्यावेळी त्याने उडवाउडवीचे उतरे दिली. दुबे यांनी त्याच्याकडे संबंधित वनविभाग अथवा पालिकेचा परवानादेखील मागितला. परंतु वनविभागाचा परवाना नव्हता शिवाय पालिकेने जो परवाना दिला होता. तो एकच झाडाचा होता. ते म्हणजे उपजिल्हा रुग्णालयाजवळचे होते. तेही त्याने आधीच तोडले होते. वनविभागाचे कर्मचाऱ्यांना हा प्रकार कळविल्यानंतर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी चौकशी केल्यानंतर वाहन लाकडासह जप्त केले आहे. विशेष म्हणजे या व्यापाऱ्याने आपल्या वाहनात कत्तल केलेल्या वृक्षांच्या लाकडांवर बाभळीची झुडपे तोडून ठेवली होती. याप्रकरणी तळोदा वन विभागाचे वनक्षेत्रपाल नीलेश रोहडे यांना मोबाइलवरून संपर्क केला असता त्यांनी उचलला नाही. परंतु ते रजेवर आहेत. सोमवारी आल्यानंतर चौकशी करणार आहेत. मात्र आजतागायत बेकायदेशीरपणे बिनभोबाट डेरेदार वृक्षांची कत्तल केली जात असल्याने संबंधित यंत्रणांच्या भूमिकेबाबत वृक्षप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आता या व्यापाऱ्यावर काय कारवाई होते याकडे लक्ष लागले आहे.

हातोडा रस्त्यावर पालिकेने रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे तेथे अडथळा ठरणारे उपजिल्हा रुग्णालयाजवळील एकच झाड व चिनोदा रस्त्यावरील १८ झाडे अशी १९ झाडे उतरविण्याची परवानगी सबंधित व्यापाऱ्यास देण्यात आली होती. या उपरात इतर झाडे तोडून उतरविले असेल, तर पालिका अभियंता सोमवारी प्रत्यक्ष पंचनामा करण्यास पाठवून कारवाई करण्यात येईल.

-सपना वसावा, मुख्याधिकारी, नगरपालिका, तळोदा

Web Title: Action against illegal loggers in Talodya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.