नंदुरबारसह शहाद्यात अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:30 IST2021-05-10T04:30:01+5:302021-05-10T04:30:01+5:30

माळीवाडा भिलाटी भागात देखील कारवाई करण्यात आली. मगन अमऱ्या नाईक एका घराच्या बाजूला गावठी दारू विक्री करीत होता. पोलिसांनी ...

Action against illegal liquor sellers in Shahada including Nandurbar | नंदुरबारसह शहाद्यात अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई

नंदुरबारसह शहाद्यात अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई

माळीवाडा भिलाटी भागात देखील कारवाई करण्यात आली. मगन अमऱ्या नाईक एका घराच्या बाजूला गावठी दारू विक्री करीत होता. पोलिसांनी त्यास शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडून साडेचार हजार रुपये किमतीची १५० लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली. याबाबत पोलीस कर्मचारी इम्रान खाटीक यांनी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार जगदीश पवार करीत आहे.

जळका बाजार परिसरात एक जण गावठी व देशी दारू विक्री करीत असताना आढळून आला. अखित अब्दुल कादीर कुरेशी, रा. शास्त्री मार्केट याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडे ७८० रुपयांची देशी दारू व २७०० रुपये किमतीची गावठी दारू जप्त करण्यात आली. याबाबत पोलीस कर्मचारी कल्पेश रामटेके यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहादा येथे टेक भिलाटी भागात कारवाई करण्यात आली. या ठिकाणी विलास अशोक भगरे, रा. एकलव्यनगर, शहादा हा अवैध दारू विक्री करताना आढळून आला. त्याच्याजवळ १२ हजार ४२ रुपये किमतीच्या विदेशी दारूच्या बाटल्या तसेच २४०० रुपये किमतीची गावठी दारू आढळून आली. याबाबत पोलीस कर्मचारी भरत बाविस्कर यांनी फिर्याद दिल्याने विलास भगरे याच्याविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक जगदीश पाटील करीत आहेत.

Web Title: Action against illegal liquor sellers in Shahada including Nandurbar