शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
6
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
7
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
8
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
9
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
10
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
11
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
12
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
13
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
14
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
15
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
16
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
17
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
18
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
19
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
20
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी

दरोड्याच्या गुन्ह्यासह घरफोडीतील आरोपी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 12:39 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपींसह दोन घरफोडींमधील आरोपींना ताब्यात घेण्यास स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेच्या पथकाला यश ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपींसह दोन घरफोडींमधील आरोपींना ताब्यात घेण्यास स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेच्या पथकाला यश मिळाले. या गुन्हेगारांकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.शहादा तालुक्यातील औरंगपूर येथील धरमदास मंगळू पाटील यांच्यावर गावाच्या शिवारातील शेतात १० ते १२ जणांच्या जमावाने दगड, लाठ्या-काठ्यांनी हल्ला केला होता. त्यांच्याकडून तीन हजार ५०० रुपये रोख व दोन हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरून नेला होता. हा प्रकार दरोड्याचा असल्यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी एलसीबीला सुचना दिल्या होत्या.एलसीबीचे निरिक्षक किशोर नवले यांनी एक अधिकारी व दहा पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक नेमून तपास सुरू केला, मात्र धागेदोरे मिळत नव्हते. अशातच २२ मे रोजी नवले यांना या गुन्ह्यातील संशयीत परिवर्धा व औरंगपूर येथीलच असल्याचे समजले. त्यांनी पथकाला लागलीच तेथे पाठविले.राजेश ठाकरे, हेमराज गणपत न्हावी व बाजीगर सुरेश पवार यांना ताब्यात घेतले. त्यांना विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्यात सहभागी असल्याची कबुली दिली. त्यांच्यासोबतच्या इतर साथीदारांची नावे देखील समोर आली असून सर्व औरंगपूर परिसरातीलच असल्याचे स्पष्ट झाले आहे. लवकरच त्यांनाही ताब्यात घेण्यात येणार आहे.दुसºया घटनेतील आरोपी व त्याच्याकडून मुद्देमाल घेणाºया तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. शहादा येथील वृंदावन कॉलनीत राहणारे महेश पंडित जव्हेरी यांच्या उघड्या घरातून चोरट्यांनी ५ एप्रिल रोजी दहा हजार रुपये किंमतीची सोन्याची मंगलपोत व मोबाईल चोरीस गेला होता. यातील संशयीत हा कमी किंमतीत मोबाईल विक्री करीत असल्याची माहिती निरिक्षक किशोर नवले यांना मिळाली असता त्यांनी उंटावद शिवारातील झोपडपट्टीत पथकाला पाठविले. पथकाने डमी ग्राहक पाठवून प्रकाश विजय पावरा, रा.तोरमाळ यास ताब्यात घेतले. त्याने मोबाईल शहादा येथील दोघांना विकल्याचे सांगितले. पोलिसांनी समीर शहाद महोमद शहा व वसीमखान जहीरखान रा.शहादा यांना ताब्यात घेतले. प्रकाश पावरा याने वृंदावन कॉलनीतील चोरीतील मोबाईल असल्याची कबुली दिली.तिसरी चोरीची घटना शहाद्यातीलच खरेदी विक्री संघाच्या दुकान संकुलातील उघडकीस आली. बाजार परिसरात अल्पवयीन बालकाकडे महागडा मोबाईल असल्याने त्याला विचारणा केली असता त्याने दुकानातून मोबाईलची चोरी केल्याची कबुली दिली.ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेचे निरिक्षक किशोर नवले, उपनिरिक्षक योगेश राऊत, हवालदार दिपक गोरे, प्रमोद सोनवणे, विकास अजगे, विकास कापुरे, मोहन ढमढेरे, विजय ढिवरे, पुरुषोत्तम सोनार, शोएब शेख यांच्या पथकाने केली. संशयीतांकडून इतरही गुन्ह्यांची माहिती मिळण्याची शक्यता आहे.औरंगपूर येथील दरोड्याच्या गुन्ह्यातील संशयीत हे पुर्ण नियोजन करूनच गुन्हा करण्यासाठी निघाले होते. यातील तिघे एका ठिकाणी लग्नात असतांना त्यांना फोन करून बोलावून घेतले होते. त्यानंतर आधीच त्या ठिकाणी असलेले आठ ते नऊजण आणि हे तिघे अशा १२ जणांनी थेट शेतकरी दाम्प्त्यावर हल्ला केला होता. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते.