शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

जामिनावरील 18 वर्षापासून फरार आरोपीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 13:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जबरी चोरीतील गुन्ह्यातील जामिनावर सुटलेला व 18 वर्षापासून फरार असलेल्या संशयीताला स्थानिक गुन्हा अन्वेशन ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जबरी चोरीतील गुन्ह्यातील जामिनावर सुटलेला व 18 वर्षापासून फरार असलेल्या संशयीताला स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेच्या पथकाने मध्यप्रदेशातील बडवाणी येथे जावून शिताफीने अटक केली. सारंगखेडा पोलीस   ठाण्याअंतर्गत 2002 मध्ये जबरी चोरीचा गुन्हा घडून तो दाखल झाला होता. या गुन्ह्यातील संशयीत शेरसिंग रतनसिंग तडवी, रा.बलखड, जि.बडवाणी यास अटक करण्यात आली होती. त्यानंतर तो जामिनावर सुटला होता. जामिनावर सुटल्यानंतर तो फरारच होता. 18 वर्षापासून त्याचा शोध सुरू होता. त्याला दोन वॉरंट काढून फरार घोषीत करण्यात आले होते. संशयीत शेरसिंग तडवी याच्या ठावठिकाणाची माहिती एलसीबीचे निरिक्षक किशोर नवले यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला त्याचा शोध घेण्यासाठी रवाना     केले. तडवी हा गावी ये-जा करून राहत असल्याचे समजले.    पथकातील कर्मचा:यांनी परिसरातील शेतांमध्ये मजुर म्हणून काम करून त्याची सर्व माहिती काढली. 21 नोव्हेंबर रोजी शेरसिंग तडवी हा शेतात काम करण्यासाठी आला असता पथकाने त्यास शिताफीने अटक  केली. यासाठी त्यांना बडवाणी पोलीस ठाण्याचे निरिक्षक राजेश यादव, उपनिरिक्षक एम.एस.डावर, हिरुसिंग रावत, बलविरसिंग मंडलोई, अंतरसिंग रावत यांनी सहकार्य केले. ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेचे निरिक्षक किशोर नवले व पथकाने केली.