खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस सिल्लोड येथून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 12:19 IST2019-12-26T12:19:38+5:302019-12-26T12:19:44+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहादा येथे २००२ मधील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला एलसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले़ या आरोपीचा शोधात ...

Accused accused of murder convictions arrested from Sillod | खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस सिल्लोड येथून अटक

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस सिल्लोड येथून अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहादा येथे २००२ मधील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला एलसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले़ या आरोपीचा शोधात पथक उत्तरांचल राज्यात जाऊन आल्यानंतरही तो मिळून आला नव्हता़
२००२ मध्ये शहादा-दोंडाईचा रोडवरील हॉटेलमध्ये काम करणाऱ्या रामदास शामा धाडगे यांचा खून झाला होता़ याप्रकरणी पोलीसांनी मनोरंजन कमलचंद मंडल, चिंग्यांगो महेश विधकमी, मुकेश मोतीलाल ठाकूर, प्रकाशसिंग माधवसिंग गडीया, हरीचंद्र नैनसिंग जेठवा यांना अटक करुन न्यायालयीन कामकाज केले होते़ दरम्यान न्यायालयाने प्रकाशसिंग गडीया यास जन्मठेपेची तर इतर चौघांना निर्दोष सोडले होते़ शिक्षेविरोधात प्रकाशसिंग याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती़ यातून शिक्षेला स्थगिती मिळाली होती़ तेव्हापासून प्रकाशसिंग हा फरार होता़ दरम्यान न्यायालयाने शिक्षा कायम ठेवल्याचा निकाल दिला होता़ यामुळे एलसीबीचे पथक त्याचा शोध घेत होते़ तो उत्तरांचलमध्ये असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने तेथे भेट दिली होती़ परंतू याठिकाणी तो मिळून आला नव्हता़ दरम्याम प्रकाशसिंग हा सिल्लोड येथील एका हॉटेलमध्ये काम करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला २३ डिसेंबर रोजी रात्री ताब्यात घेण्यात आले़ पथकाने उत्तरांचलमध्ये सुरु असलेल्या बर्फवृष्टीचा सामना करत संशयिताचा शोध घेणे सुरु ठेवल्याने पोलीस अधीक्षक पंडीत यांना त्यांचा गौरव केला़ ही कामगिरी पोलीस निरीक्षक किशोर नवले, पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप राजपूत, दिपक गोरे, योगेश सोनवणे, मोहन ढमढेरे, विजय ढिवरे यांनी केली़

Web Title: Accused accused of murder convictions arrested from Sillod