शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात पावसाळापूर्व कामाला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:34 IST

पावसाळा अगदी तोडांवर येऊन ठेपल्याने ग्रामीण भागातील शेतकरी व ग्रामस्थांनी आपापल्या राहत्या घरी गुरांसाठी लागणारा चारा साठवण्याचा वाडा, गुरांचे ...

पावसाळा अगदी तोडांवर येऊन ठेपल्याने ग्रामीण भागातील शेतकरी व ग्रामस्थांनी आपापल्या राहत्या घरी गुरांसाठी लागणारा चारा साठवण्याचा वाडा, गुरांचे गोठे, व शेतीमाल साठवण करण्याची मोठी गोदामे तसेच मातीच्या घरांचे छत, धाबे दुरुस्त करण्याच्या कामाला वेग दिला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ बंद आहेत. त्यात काही वेळ सूट मिळत असून, बाजारपेठ सुरू झाल्याने शेतकऱ्यांना दुरुस्तीसाठी लागणाऱ्या वस्तू उपलब्ध होत असल्यामुळे कामाला गती आली आहे.

तालुक्यातील डोंगरगाव, सावखेडा, शेल्टी आदी शिवारातून पूर्वी बैल गाडीवरून मोठ्या कष्टाने खारी माती आणली जायची. मात्र आता ट्रॅक्टरने महाग खारी माती आणून धाब्यांवर टाकली जाते. सध्या खारी मातीसाठी मोठी किंमत मोजावी लागते. पूर्वी पावसाळ्याच्या दीड ते दोन महिना आधीपासून खारी माती लांबून आणून अंगणात टाकली जायची. त्यानंतर मित्र मंडळीतील ८ ते १० व्यक्तींना बोलवून त्यांच्या मदतीने प्रेमाच्या भावनेपोटी खारी माती धाब्यांवर मोफत चढवून पसरविली जायची. त्यानिमित्ताने मित्र मंडळी एकत्र येत छोटेखानी चहा, नास्त्याचा कार्यक्रमदेखील होत असे. मात्र हे चित्र आता ग्रामीण भागात बदललेले दिसून येते. याच कामासाठी आता पैसे मोजावे लागत असल्याचे चित्र आहे.

खारी माती महाग झाल्याने सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. त्यावर उपाय म्हणून प्लॅस्टिक कागद पूर्ण धाब्यांवर अंथरण्यात येत आहे. त्यासाठी धाबे कोरून कागद अंथरल्यावर माती टाकली जाते. या कामासाठी मजुरी द्यावी लागते.

तालुक्यातील शोभानगर, वडछील पुनर्वसन, राणीपूर, पिंप्राणी आदी आदिवासी पट्ट्यातील गावांमध्ये पावसाळ्यात घर गळू नये म्हणून कौलांच्या दुरुस्तीची कामे असून, घरांची बांधणी करण्यात येत आहे. कुटुंबासह आदिवासी बांधव घरांची बांधणी करतानाचे चित्र दिसून येत आहे. तसेच पावसाळ्यात सरपणाची कमतरता भासू नये म्हणून शेतकऱ्यांच्या वतीने शेतातील कापसाच्या काड्या घराभोवती साठवण्यात येत आहेत. तसेच गुरांसाठी लागणारा सुका चाऱ्याची साठवणूक सुरू आहे. पावसाळ्यात शेतात असलेला गुरांसाठीचा चारा ओला होऊ नये म्हणून शेतकऱ्यांकडून शेडमध्ये चाऱ्याची साठवणूक करण्यात येत आहे.