शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

बसेस अभावी विद्याथ्र्याचे शैक्षणिक नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 12:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : तालुक्यातील गावांना तळोदा बसस्थानकातून सकाळी सुटणा:या  बसेसला विलंब होत असल्यामुळे शाळा-महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी वेळेत ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : तालुक्यातील गावांना तळोदा बसस्थानकातून सकाळी सुटणा:या  बसेसला विलंब होत असल्यामुळे शाळा-महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी वेळेत पोहचत नसल्याने त्यांचे वर्षभरापासून शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत तळोदा बसस्थानकाच्या प्रमुखास विद्याथ्र्यानी निवेदन देऊनही बसच्या वेळेत बदल करण्यास टाळाटाळ केली जात आहे. या प्रकरणी महामंडळाच्या विभाग नियंत्रकांनी तातडीने दखल घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा विद्याथ्र्यानी दिला आहे. दरम्यान याबाबत बसस्थानकातील प्रमुखास विचारले असता अक्कलकुवा आगाराकडे निवेदन पाठविले असल्याचे सांगण्यात आले.तळोदा तालुक्यातील रांझणी परिसरातील गोपाळपूर, नवागाव व चिनोदा या गावांमधील साधारण 70 ते 80 मुले व मुली शाळा व महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी तळोद्याला येत असतात. या विद्याथ्र्याना अपडाऊन करण्यासाठी अक्कलकुवा आगाराकडून तळोद्याहून सकाळी सव्वासात वाजता बसची व्यवस्था करण्यात आली आहे. या बसमधून प्रवास करून सर्व शाळा, महाविद्यालयीन मुले तळोद्याला येत असतात, असे असले तरी या बसच्या वेळापत्रकामुळे विद्याथ्र्याना अडचणीचे ठरत आहे. कारण ही बस तळोद्याहून साडेसहा, पावणेसात वाजेला सुटून ती साधारण साडेसातला पोहचत असते. साहजिकच यामुळे विद्यार्थी वेळेवर शाळेत पोहचू शकत नाही. शाळा, महाविद्यालय भरण्याची वेळ, सव्वासात, साडेसात वाजेला असते. त्यामुळे विद्याथ्र्याचा पहिला तास कामस्वरूपी वाया जात असतो. त्यातही शालेय विद्याथ्र्याचा पहिला तास गणित अथवा इंग्रजीचा असतो. बसमुळे वेळेवर पोहोतच नसल्याने या कठीण विषयांचे नुकसान होत असल्याचे विद्यार्थी सांगतात. रस्त्याच्या दुरवस्थेने बसला रांझणीर्पयत पोहोचणे तेथून पुन्हा तळोद्याला येण्यात बराच वेळ लागतो. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन तळोदा-रांझणी या सकाळी सुटणा:या बसच्या वेळेत बदल करावा, अशी विद्याथ्र्याची मागणी आहे. तसे निवेदनही महिनाभरापूर्वी तळोदा बसस्थानकाच्या प्रमुखांना दिले आहे. याप्रकरणी तातडीने दखल घेऊन वेळेत बदल करण्याची आवश्यकता असतांना विद्याथ्र्याच्या निवेदनास केराची टोपली दाखवत उदासिन धोरण घेतल्याचा विद्याथ्र्याचा आरोप आहे. वास्तविक बसच्या वेळेत थोडासा बदल करण्याची मागणी आहे. ही बस सकाळी सहा वाजेला तळोद्याूहन रांझणीस साडेसहा तेथून सातवाजेला तळोद्यात पोहोचली तर विद्याथ्र्याना सकाळच्या तासिका सुरळीत सापडतील. मात्र अक्कलकुवा आगारप्रमुख एवढी तसदी घ्यायलादेखील तयार नसल्याने या प्रशासनाच्या हेकेखोर प्रवृत्तीबाबत विद्याथ्र्यानी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे विद्यार्थिनींसाठी एस.टी महामंडळाने मानव विकास मिशन अंतर्गत स्वतंत्र बस असतांना या बसमध्ये इतर प्रवाशांना बसवून विद्यार्थिनींना अक्षरश: कोंबून        आणले जात असल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केला आहे. त्याचबरोबर हे विद्यार्थी वेळेवर पोहोचत नसल्यामुळे त्यांना शिक्षकांचा रोषदेखील पत्करावा लागत असल्याचे विद्यार्थी म्हणात. या मार्गावरील विद्याथ्र्याचे होत असलेले शैक्षणिक नुकसान लक्षात घेऊन एस.टी. महामंडळाच्या वरिष्ठ प्रशासनाने दखल घेऊन तातडीने बसच्या वेळेस बदल करावा, अशी मागणी विद्याथ्र्यानी केली आहे.