आमदार बच्चू कडू यांचा आसूड संघर्ष मोर्चा गुजरातच्या दिशेने रवाना

By Admin | Updated: April 20, 2017 13:31 IST2017-04-20T13:31:01+5:302017-04-20T13:31:01+5:30

आमदार बच्चू कडू यांनी काढलेली शेतकरी आसूड संघर्ष मोर्चा नवापूरमार्गे सुसाट गुजरातकडे निघून गेली.

Aadhaar Sangh Morcha of MLA Bachu Kadu went towards Gujarat | आमदार बच्चू कडू यांचा आसूड संघर्ष मोर्चा गुजरातच्या दिशेने रवाना

आमदार बच्चू कडू यांचा आसूड संघर्ष मोर्चा गुजरातच्या दिशेने रवाना

 नंदुरबार,दि.20- आमदार बच्चू कडू यांनी काढलेली शेतकरी आसूड संघर्ष मोर्चा नवापूरमार्गे सुसाट गुजरातकडे निघून गेली. दरम्यान, गुजरात व महाराष्ट्र हद्दीवर उच्छलनजीक हा मोर्चा गुजरात पोलिसांनी तासभर रोखून ठेवला होता.

शेतक:यांच्या शेतीमालाला हमी भाव मिळावा यासह इतर मागण्यांसाठी आमदार बच्चू कडू यांनी आसूड संघर्ष मोर्चा काढला आहे. धुळे जिल्ह्यातून नवापूर येथे ही यात्रा बुधवारी रात्री येणार होता. परंतु प्रत्यक्षात गुरुवारी दुपारी 12 वाजता मोर्चा नवापूरात आला. महामार्गाने सरळ मोर्चा गुजरातकडे रवाना झाला. नवापूर हद्द आणि गुजरात सिमेवर महाराष्ट्र व गुजरात पोलिसांचा फौजफाटा तैणात होता. अवघे पाच ते दहा मिनिटे नवापूरात थांबल्यानंतर मोर्चा गुजरात हद्दीत प्रवेश केल्यानंतर उच्छल येथे  तासभर थांबवून ठेवण्यात आले.

Web Title: Aadhaar Sangh Morcha of MLA Bachu Kadu went towards Gujarat