पावसामुळे शेतकऱ्यांना उभारी खरीप क्षेत्राची ९९ टक्के भरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 01:03 PM2020-08-11T13:03:29+5:302020-08-11T13:03:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पावसाने जोर धरला असल्याने जिल्ह्यात थांबवण्यात आलेल्या पेरण्यांचे आकडे पुन्हा वाढत असून सोमवारअखेरीस ९९ ...

99 per cent of kharif area flooded due to rains | पावसामुळे शेतकऱ्यांना उभारी खरीप क्षेत्राची ९९ टक्के भरारी

पावसामुळे शेतकऱ्यांना उभारी खरीप क्षेत्राची ९९ टक्के भरारी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : पावसाने जोर धरला असल्याने जिल्ह्यात थांबवण्यात आलेल्या पेरण्यांचे आकडे पुन्हा वाढत असून सोमवारअखेरीस ९९ टक्के क्षेत्रावर पिकांच्या पेरण्या पूर्ण झाल्याची माहिती आहे़ शेतकऱ्यांनी सरासरी ४० टक्के पाऊस असताना ९० टक्के पेरण्या गेल्या १५ दिवसांपूर्वीच पूर्ण केल्या होत्या़
जिल्ह्यात पाऊस बरसणार असल्याची माहिती असून येत्या दोन-चार दिवसात १०० टक्के पेरणीक्षेत्रावर खरीप पिके दिसून येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़ शेतकºयांनी यंदा प्रामुख्याने कापूस, सोयाबीन, भात, ज्वारी आणि मका या पिकांवर भर दिला आहे़ पावसाअभावी यंदा कडधान्य पिक पेरणीत घट येऊन क्षेत्रही कमी झाल्याचे दिसून आले आहे़ गेल्या वर्षी जिल्ह्यात झालेल्या विक्रमी पावसाच्या पार्श्वभूमीवर शेतकºयांनी १०० टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्रात पेरण्या केल्या होत्या़ पाऊस उशिराने आल्याने पेरणीचा कालावधी लांबला होता़ यंदाही तीच स्थिती निर्माण झाल्याने शहादा तालुका वगळता इतर पाच तालुक्यातील शेतकºयांनी पावसाचा अंदाज घेत पिकांच्या पेरणीला सुरूवात केली होती़ यातून अद्याप ठिकठिकाणी पेरणीची कामे शेतकरी करत असल्याचे चित्र दिसून येत आहे़
यंदाच्या हंगामात शहादा तालुक्यात ९९ टक्के, तळोदा ११०, धडगाव १०९ तर अक्कलकुवा तालुक्यात १०१ टक्के पेरण्या झाल्या आहेत़ पावसाची स्थिती समाधानकारक असल्याने या तालुक्यांमध्ये निर्धारित क्षेत्रापेक्षा वाढीव पेरण्या झाल्या आहेत़
दुसरीकडे सर्वाधिक पसंतीचा कापूस यंदा १ लाख २४ हजार ६६४ हेक्टरवर लागवड करण्यात आला आहे़ यात नंदुरबार ४८ हजार ८१, नवापूर ८ हजार ५३१, शहादा ५० हजार ४८२, तळोदा १० हजार १०६, धडगाव १ हजार १४ तर अक्कलकुवा तालुक्यात ६ हजार ३९० हेक्टरवर कापूस लागवड झाली आहे़
जिल्ह्यात आजअखेरीस १८ हजार ८१ हेक्टर क्षेत्रात भात़, ३० हजार ४७ हेक्टर क्षेत्रात ज्वारी़
३१ हजार ४५५ हेक्टरवर मका़
२१ हजार १४६ हेक्टर सोयाबीन पेरा पूर्ण झाला आहे़
धान्य आणि तेलबिया पिकांचे क्षेत्र वाढताना मात्र कडधान्य पिकांचे क्षेत्र घटले आहे़ १७ हजार हेक्टरव होणार तूर १० हजार, मूग ४ हजार तर उडीद ९ हजार ३२५ हेक्टरपर्यंत आहे़
जिल्ह्यात २ लाख ९५ हजार २१९ हेक्टरवर यंदा पेरण्यांचे नियोजन होते़ त्यातुलनेत आजअखेर २ लाख ८० हजार २०१ हेक्टर क्षेत्रात खरीप पेरण्या पूर्ण करण्यात झाल्या आहेत़ यात नंदुरबार ६७ हजार ८ हेक्टर, नवापूर ५५ हजार १७३, शहादा ७५ हजार ३६८, तळोदा २३ हजार ७४७, धडगाव १९ हजार ७२३ तर अक्कलकुवा तालुक्यात ३९ हजार ६८१ हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरण्या पूर्ण करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे़

Web Title: 99 per cent of kharif area flooded due to rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.