शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
2
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
3
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
4
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
5
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
6
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
7
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
8
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
9
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
10
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
11
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
12
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
13
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
14
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
15
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
16
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
17
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
18
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
19
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
20
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
Daily Top 2Weekly Top 5

सातपुड्यातील पाणीटंचाई निर्मूलनासाठी ७०० कोटींचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:32 IST

सभेच्या प्रारंभी सदस्यांच्या रजेच्या अर्जांना मंजुरी देण्यात आली. त्यानंतर सदस्यांनी विचारलेल्या लेखी प्रश्नांना उत्तरे देण्यात आली. शासन परिपत्रकांचे वाचन ...

सभेच्या प्रारंभी सदस्यांच्या रजेच्या अर्जांना मंजुरी देण्यात आली. त्यानंतर सदस्यांनी विचारलेल्या लेखी प्रश्नांना उत्तरे देण्यात आली. शासन परिपत्रकांचे वाचन करण्यात येऊन मागील सभेचे इतिवृत्त कायम करण्यात आले. दरम्यान, विषय समित्यांच्या कामांचा आढावा सादर करण्यात आला. यावेळी धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील पाणीटंचाईच्या विषयावर कामकाजाबाबत सदस्य विजय पराडके यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावर पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता युवराज वळवी यांना योग्य उत्तर न देता आल्याने सभापती रतन पाडवी व जिल्हा परिषद अध्यक्षा ॲड. वळवी यांनी नाराजी व्यक्त करत धडगाव तालुक्यातील आश्रमशाळा असलेल्या गावांमध्ये उपाययोजना करण्याचे सूचित केले. यादरम्यान माहिती देताना रतन पाडवी यांनी सांगितले की, पालकमंत्री पाडवी यांच्या आदेशाने धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील गावांमध्ये भूजल सर्वेक्षण विभागाकडून सर्वेक्षण करून त्याठिकाणी जलस्रोत नेमके कसे व काय याचा शोध घेण्याचे सांगण्यात आले होते; परंतु विभागाचे अधिकारी त्याठिकाणी गेले किंवा कसे याची माहिती मिळत नाही. अभियंता वळवी यांनाही याबाबतचे उत्तर देता न आल्याने कामांना गती देण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी गावडे यांनी दिल्या. दरम्यान, धडगाव व अक्कलकुवा ताुलक्यातील कोणतीच पाणी पुरवठा योजना यशस्वी नसल्याचा दावा सभापती रतन पाडवी यांच्याकडून करण्यात आला.

याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पालकमंत्री ॲड. पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीची माहिती देत, सातपुड्यात बारमाही पाणी देण्याच्या योजनेची माहिती देत ७०० कोटी रुपयांचा प्रस्ताव यासाठी दिला असल्याचे सांगितले.

‘लोकमत’चे वृत्त दाखवत सभागृहाचे वेधले लक्ष

नंदुरबार जिल्ह्यात समाजकल्याण विभागामार्फत बोगस वृद्धाश्रम चालविण्याचे प्रकरण ‘लोकमत’ने उघडकीस आणले आहे. या प्रकरणाची जिल्ह्यात चर्चा आहे. कोट्यवधी रुपयांचा हा गैरव्यवहार असून, याबाबत चाैकशी करण्याची मागणी सभेत सदस्य सी. के. पाडवी यांनी केली. यावर सभेत समाजकल्याण निरीक्षक विवेक चव्हाण यांनी कारवाई सुरू असल्याची माहिती दिली. सभापती पाडवी, अध्यक्षा ॲड. वळवी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीही या प्रकरणाची चाैकशी कठोरपणे करण्याच्या सूचना केल्या.