शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
4
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
5
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
6
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
7
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
8
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
9
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
10
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
11
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
12
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
13
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
14
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
15
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
17
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
18
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
19
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
20
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय आश्रम शाळेतील ५३ कर्मचाऱ्यांच्या मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:22 IST

तळोदा : राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत चालविण्यात येत असलेल्या शासकीय आश्रम शाळेतील ५३ कर्मचाऱ्यांच्या मृत्यू कोरोना महामारीने झाला ...

तळोदा : राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत चालविण्यात येत असलेल्या शासकीय आश्रम शाळेतील ५३ कर्मचाऱ्यांच्या मृत्यू कोरोना महामारीने झाला आहे. यात नंदुरबार जिल्ह्यातील ११ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मुख्याध्यापक अन् शिक्षकांवरच अधिक क्रूर काळाने घाला घातला आहे. दरम्यान, खावटी अनुदानाच्या कामामुळे संसर्ग झाल्याचा आरोप शिक्षकांनी केला असून शासनाने त्याचा कुटुंबांना विम्याचे संरक्षण देण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे. कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः अक्राळविक्राळ रूप धारण केले आहे. साहजिकच यामुळे रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यातही त्याचा माणसाच्या शरीरात वेगाने संसर्ग वाढत असल्यामुळे रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण अधिक वाढले आहे. परिणामी राज्याचा मृत्यूदरदेखील वाढला आहे. राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पामार्फत चालवल्या जाणाऱ्या शासकीय व खासगी अनुदानित आश्रम शाळेतील कर्मचारी यांचेही कोरोनाने निधन झाल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत जवळपास ५३ कर्मचाऱ्यांचा या महामारीने मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. यात नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा व नंदुरबार प्रकल्पातील ११ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मुख्याध्यापक, शिक्षकांचा अधिक समावेश आहे. सध्या राज्यातील सर्वच प्रकल्पांमध्ये खावटी अनुदानाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. साहजिकच कर्मचाऱ्यांनादेखील या कामांमुळे प्रत्यक्ष लाभार्थ्यांकडे जावे लागत असते. त्यामुळे साहजिकच संपर्क वाढल्याचे शिक्षक सांगतात. परिणामी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होत असल्याचे म्हटले जाते. या सर्वच कर्मचाऱ्यांनी खावटी अनुदानासाठी शासनाचे काम केले आहे.त्यामुळे त्यांचा बीमा संरक्षणाच्या लाभ नातेवाईकांना द्यावा, अशी मागणी आहे.