नंदुरबार जिल्ह्यात ५१ जण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 12:25 IST2020-08-12T12:25:25+5:302020-08-12T12:25:33+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोविड रुग्णालय तसेच कोविड केअर सेंटरमधून मंगळवारी दिवसभरात ५१ जणांना घरी सोडण्यात आले़ प्रथमच ...

51 corona free in a day | नंदुरबार जिल्ह्यात ५१ जण कोरोनामुक्त

नंदुरबार जिल्ह्यात ५१ जण कोरोनामुक्त

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोविड रुग्णालय तसेच कोविड केअर सेंटरमधून मंगळवारी दिवसभरात ५१ जणांना घरी सोडण्यात आले़ प्रथमच एवढ्या मोेठ्या संख्येने रुग्णांना घरी सोडण्यात आले़ जिल्ह्यात बरे झालेल्यांची संख्या ही ५६० झाली असून २०६ जण उपचार घेत आहेत़
मंगळवारी दुपारी १४ जणांना डिस्चार्ज कोविड केअर सेंटर, जिल्हा रुग्णालय येथून डिस्चार्ज देण्यात आला होता़ यानंतर काही कालावधीत पुन्हा ३७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला़ दिवसभरात घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक ३९ रूग्ण हे नंदुरबार शहर आणि तालुक्यातील आहेत़ तर शहादा येथील ४, तळोदा ३ तर नवापूर येथील एकास डिस्चार्ज देण्यात आला आहे़ गेल्या दोन दिवसात नवीन बाधितांची संख्या समोर आलेली नसली तरी रुग्ण बरे होण्याची संख्या वाढत असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे़ जिल्ह्यात आजवर सर्वाधिक ३६९ रुग्ण नंदुरबार, १२२ शहादा, तळोदा ३३, नवापूर १७, अक्कलकुवा १७ तर धडगाव तालुक्यातून एक रुग्ण बरा होवून घरी परत आला आहे़ जिल्ह्यात कोरोनामुळे ४७ आजअखेरीस जणांचा मृत्यू झाला आहे़ जिल्ह्यात आजअखेरीस एकूण ८५९ रूग्ण आढळून आले आहेत़ प्रशासनाने ५ हजार जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले होते़ यातील ३ हजार ९५० जणांचे स्वॅब अहवाल नेगेटिव्ह तर ८५९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते़ जिल्हा रुग्णालयात रॅपिड अँटीजेन आणि ट्रूनेट मशिनद्वारे कोरोना चाचणीची सोय करण्यात आली आहे़ यातून रुग्णांच्या स्वॅब तपासणीला वेग आला आहे़ आजअखेरीस १६९ जणांचे कोरोना अहवाल प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे़ बुधवारी दुपारपर्यंत हे अहवाल समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे़

Web Title: 51 corona free in a day