शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
6
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
7
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
8
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
9
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
10
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
11
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
12
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
13
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
14
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
15
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
16
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
17
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
18
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
19
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
20
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
Daily Top 2Weekly Top 5

स्वाभिमान सप्ताहात ५०१ बॅगा रक्त संकलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 13:16 IST

 लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  राष्ट्रवादी कॅांग्रेसतर्फे स्वाभिमान सप्ताह साजरा करण्यात येणार असून त्याअंतर्गत पक्षाच्या ८१ शाखांचे उद्‌घाटन करून ...

 लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  राष्ट्रवादी कॅांग्रेसतर्फे स्वाभिमान सप्ताह साजरा करण्यात येणार असून त्याअंतर्गत पक्षाच्या ८१ शाखांचे उद्‌घाटन करून ५०१ रक्तदान बॅगांचे संकलन केले जाणार आहे. दरम्यान, मुंबई येथे होणारा अभिष्टचिंतन सोहळाचे थेट प्रेक्षेपण नाट्यगृहासह त्या त्या तालुकास्तरावर केले जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॅा.अभिजीत मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या वाढदिवासानिमित्त १२ डिसेंबरपासून स्वाभिमान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त आयोजित विविध उपक्रमांची माहिती देण्यासाठी जिल्हाध्यक्ष अभिजीत मोरे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी माजी आमदार उदेसिंग पाडवी व पदाधिकारी उपस्थित होते. मोरे यांनी सांगितले, जिल्ह्यात राष्ट्रवादीतर्फे आठवडाभर विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. त्यात रक्तदान शिबिरे घेण्यात येणार आहेत. जिल्हाभरातून ५०१ रक्तबॅगांचे संकलन केले जाणार आहे. सद्या जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा असून तो या माध्यमातून भरून घेतला जाणार आहे. पक्ष वाढीसाठी देखील उपक्रम घेण्यात येणार आहे. सप्ताहात तब्बल ८१ ठिकाणी राष्ट्रवादी पक्ष शाखेचे उद्‌घाटन करण्यात येणार आहे. याशिवाय तीन हजार जणांना आरोग्य किट वाटप केेले जाणार आहेत. याशिवाय स्थानिक पातळीवर इतरही विविध उपक्रम राबविले जाणार      आहेत.पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार यांचा अभिष्टचिंतन सोहळा हा मुंबई येथे होणार आहे. त्या सोहळ्याला कोरोनामुळे मोजक्याच लोकांना प्रवेश राहणार आहे. त्यामुळे त्याचे थेट प्रेक्षेपण करण्यात येणार आहे. नंदुरबारातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात एलईडी लावण्यात येणार आहे. याशिवाय त्या त्या तालुक्याच्या ठिकाणी देखील बंदीस्त सभागृहांमध्ये एलईडीद्वारे प्रेक्षेपण केले जाणार असल्याची माहिती अभिजीत मोरे यांनी दिली.