मजुर कुटुंबीय महिलेच्या घरातून ५० हजार लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:27 IST2021-01-17T04:27:29+5:302021-01-17T04:27:29+5:30

नंदुरबार : उघड्या खिडकीतून प्रवेश करीत चोरट्याने ५० हजार रुपये रोख चोरून नेल्याची घटना वीरपूर, ता. अक्कलकुवा येथे घडली. ...

50,000 lampas from the house of a working woman | मजुर कुटुंबीय महिलेच्या घरातून ५० हजार लंपास

मजुर कुटुंबीय महिलेच्या घरातून ५० हजार लंपास

नंदुरबार : उघड्या खिडकीतून प्रवेश करीत चोरट्याने ५० हजार रुपये रोख चोरून नेल्याची घटना वीरपूर, ता. अक्कलकुवा येथे घडली. याबाबत अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वीरपूर येथे राहणारी व मजुरी करून आपला उदरनिर्वाह करणारी लक्ष्मीबाई गोविंद पाडवी यांच्या घरात चोरट्यांनी हातसफाई केली. चोरट्यांनी कुडाच्या घराच्या मागील खिडकीच्या वरून घरात प्रवेश केला. लक्ष्मीबाई यांनी घरात ठेवलेले ५० हजार रुपये रोख चोरट्याने लंपास केले. भरदिवसा ही घटना घडली. महिला मजुरी करून घरी परत आल्यावर त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी शोधाशोध केली; परंतु उपयोग झाला नाही. याबाबत अक्कलकुवा पोलीस ठाण्यात त्यांनी फिर्याद दिल्याने चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास जमादार मनोहर वळवी करीत आहे.

Web Title: 50,000 lampas from the house of a working woman