शासकीय दवाखान्यांमध्ये ओपीडी ८० टक्केंपर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2020 12:22 PM2020-04-07T12:22:21+5:302020-04-07T12:22:29+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात एकही खाजगी रुग्णालय अधिग्रहीत करण्यात आलेले नाही. तशी आवश्यकता देखील नसल्याचे ...

Up to 5% of OPDs in government hospitals | शासकीय दवाखान्यांमध्ये ओपीडी ८० टक्केंपर्यंत

शासकीय दवाखान्यांमध्ये ओपीडी ८० टक्केंपर्यंत

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात एकही खाजगी रुग्णालय अधिग्रहीत करण्यात आलेले नाही. तशी आवश्यकता देखील नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, जिल्ह्यातील उपजिल्हा व ग्रामिण रुग्णालयांमधील ओपीडी सरासरीपेक्षा कमी झाली आहे. गेल्या आठवड्यापर्यंत खाजगी डॉक्टरांनी दवाखाने बंद केल्यामुळे ओपीडी वाढली होती आता ती कमी झाल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी स्पष्ट केले आहे.
कोरोनाशी मुकाबला करतांना जिल्हा आरोग्य यंत्रणेने आवश्यक त्या सर्व उपाययोजना केलेले आहेत. सद्य स्थितीत जिल्ह्यात एकही कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आलेला नाही. जे संशयीत होते त्यांचा अहवाल देखील निगेटिव्ह आलेला आहे. असे असले तरी प्रशासन सर्वच दृष्टीने तयारीत आहे. सार्वजनिक आरोग्य सेवा देणारे सर्व उपजिल्हा व ग्रामिण रुग्णालयांमध्ये आवश्यक त्या सुविधा आणि उपकरणांसह साहित्य उपलब्ध आहे.
खाजगी दवाखानांचा विचार
जिल्ह्यात एक जिल्हा रुग्णालय, दोन उपजिल्हा रुग्णालय आणि १४ ग्रामिण रुग्णालये आहेत. याशिवाय प्रत्येक तालुकास्तरावर १०० बेडचे विलगीकरण कक्ष अर्थात कॉरंटाईन कक्षासाठी होस्टेल किंवा आश्रमशाळाच्या इमारती अधिग्रहीत करण्यात आलेल्या आहेत. त्यांचे निर्जंतुकीकरण करून त्या ठिकाणी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी देखील नेमण्यात आलेले आहेत. त्यामुळे आवश्यक तेवढ्या इमारती आणि बेड उपलब्ध असल्याने खाजगी रुग्णालये ताब्यात घेणे किंवा अधिग्रहीत करण्याची वेळ आतापर्यंत आलेली नाही.
पुढील काळात देखील येण्याची शक्यता नाही. असे असले तरी खाजगी हॉस्पीटल्समधील व्हेंटीलेटर व आयसीयू बेड सज्ज ठेवण्याच्या सुचना यापूर्वीच देण्यात आलेल्या आहेत.
ओपीडी आता सामान्य
कोरोनाचा प्रादुर्भाव झाला तेंव्हापासून ते मार्च अखेरपर्यंत खाजगी दवाखाने बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे जिल्हा, उपजिल्हा, ग्रामिण रुग्णालये व आरोग्य केंद्रावर मोठा भार आला होता. परंतु १ एप्रिलपासून बहुतेक खाजगी दवाखाने सुरू झाल्यामुळे आता या सर्वांवरील भार कमी झाला आहे. त्यामुळे ओपीडी देखील सामान्य झाली आहे. नागरिक भितीपोटी किरकोळ आजारासाठी दवाखान्यातच येत नसल्याचे देखील चित्र आहे.
सध्या कोरोना व्यतिरिक्त कुठलीही सामान्य आजारांची साथ नाही. त्यामुळे आजारांचे प्रमाण कमी असल्याने सरासरी ओपीडी ८० टक्केपर्यंत असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांनी स्पष्ट केले.
आवश्यक सुविधा उपलब्ध
उपजिल्हा व ग्रामिण रुग्णालयांमधील सर्व डॉक्टर्स व वैद्यकीय कर्मचारी यांना आवश्यक तेवढे एन-९५ मास्क, सॅनिटायझर, निर्जंतुकीकरण साहित्य उपलब्ध करून दिलेले आहे. वेळोवेळी रुग्णालयांची स्वच्छता केली जात आहे. येणाऱ्या रुग्णांना सुरक्षीत अंतर ठेवून व विनाकारण दवाखान्यात इतरत्र फिरू देण्यास मनाई करण्यात येत आहे.


जिल्हा रुग्णालयात ३९ आयसीयू बेड आहेत. यासह खाजगी रुग्णालयांमधील ५३ आयसीयू बेड देखील सज्ज ठेवण्याच्या यापूर्वीच सुचना देण्यात आलेल्या आहेत. जिल्हा रुग्णालयात आयसीयू बेडची संख्या वाढण्याची तयारी आहे.
जिल्हा रुग्णालय व खाजगी रुग्णालये मिळून एकुण १९ व्हेंटीलेटर सद्य स्थितीत आहेत. आणखी व्हेंटीलेटरची आॅर्डर देण्यात आली आहे. परंतु ते सधी मिळतील याबाबत निश्चितता नाही.
जिल्ह्यात एक जिल्हा रुग्णालयासह दोन उपजिल्हा रुग्णालये व १४ ग्रामिण रुग्णालये आहेत. याशिवाय ५८ प्राथमिक आरोग्य केंद्र देखील आहेत. नंदुरबार पालिकेतर्फे राष्टÑीय ग्रामिण आरोग्य अभियानाअंतर्गत २ तर शहादा येथे एक आरोग्य केंद्र कार्यान्वीत आहेत.


जिल्हा रुग्णालयात सद्य स्थितीत ५० बेडचे विलगीकरण कक्ष सुरू आहे. या आठवड्यात त्यात वाढ करून आणखी ५० बेड वाढविण्यात येणार आहेत. त्यामुळे १०० बेडचे विलगीकरण कक्ष कार्यान्वीत राहणार आहे. जिल्हाभरात आवश्यक तेव्हढ्या बेडची सुविधा सद्य स्थितीत आहे. आवश्यकता पडल्यास त्यात वाढ करण्यात येईल. त्यामुळे सद्या तरी खाजगी दवाखाने ताब्यात घेण्याची वेळ आलेली नाही.
-डॉ.आर.एस.भोये,
जिल्हा शल्य चिकित्सक.

Web Title: Up to 5% of OPDs in government hospitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.