शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
3
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
4
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
5
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
6
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
7
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
8
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
9
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
10
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
11
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
12
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
13
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
14
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
15
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
16
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
17
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
18
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
19
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
20
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
Daily Top 2Weekly Top 5

नवापुरात 42 जणांनी केले रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 12:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : शहरातील उपजिल्हा रुग्णालयात घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 42 जणांनी रक्तदान केले.  नवापूर उपजिल्हा रुग्णालय ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : शहरातील उपजिल्हा रुग्णालयात घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 42 जणांनी रक्तदान केले. नवापूर उपजिल्हा रुग्णालय व नंदुरबार येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढींच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी रक्तदान शिबिर घेण्यात आले. शिबिराचे उद्घाटन गरोदर माता सारिका वाघरी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून वैद्यकीय अधीक्षक डॉ.किर्तीलता वसावे, नंदुरबार येथील प्रशासकीय अधिकारी डॉ.कांचन वसावे, वैद्यकीय अधिकारी डॉ.भानुदास गावीत, डॉ.प्रमोद कटारिया, डॉ.रेचल वळवी, डॉ.अमोल जाधव, डॉ.प्रीती गावीत, अक्षित अग्रवाल उपस्थित होते.डॉ.किर्तीलता वसावे यांनी उपजिल्हा रुग्णालयात प्रसूती व सिजेरियन बाळंतपणासाठी येणा:या माता आणि सिकलसेल ग्रस्त रुग्णांना रक्तपुरवठा केंद्रामार्फत आवश्यक रक्तांचा पुरवठा करण्यात येतो, अशी माहिती दिली. रक्तदान केल्याने कोणतेही दुष्परिणाम होत नाही, त्याचा शरीराला फायदाच होत असल्याने जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करावे, असे आवाहन केले. याप्रसंगी समुपदेशक कैलास माळी यांनी एचआयव्ही एड्स व सिकलसेल विषयी माहिती दिली. शहरातील विविध संस्थेतील कार्यकर्ते, नागरिक, रुग्णालयातील अधिकारी व कर्मचा:यांनी रक्तदान केले. रक्तदात्यांना प्रव्रुत्त करण्याचे कार्य बजरंग भंडारी व लाजरस गावीत यांनी तर रक्त संकलनाचे कार्य जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीतील महेंद्र चव्हाण, राजदीप वाघ, हेमंत माळी, भरत वसावे, प्रवीण ठाकूर व अहमद पिंजारी यांनी केले. शिबिरासाठी चंद्रकांत पावरा, अश्विनी वसावे, रवींद्र पिंपळे, दिनेश अहिरराव, विजय देवकर व सुनील गावीत यांनी परिश्रम घेतले.

सामाजिक भान जपतांना शहरातील अजय पद्माकर गावीत यांनी उपजिल्हा रुग्णालयात 44 व्या वेळी रक्तदान केले. त्या निमीत्ताने त्यांच्या रक्तदान कायार्चा गौरव करण्यात आला. रक्तदान श्रेष्ठदान असे म्हटले जाते. रक्तदानाचे महत्व जाणून असलेले अजय गावीत इतरांनाही रक्तदानाचे महत्व पटवून सांगतात व रक्तदानासाठी प्रवृत्तही करतात. अशा विविध क्षेत्रात कार्य करणा:या व्यक्तींमुळेच नवापुरच्या नावलौकिकात भर पडत आहे.