शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
3
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
4
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
5
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
6
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
7
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
8
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
9
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
10
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
11
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
12
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
13
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
14
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
15
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
16
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
17
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
18
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
19
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
20
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

‘टीईटी’ला ५०८ परिक्षार्थी अनुपस्थित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 14:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : डीएड व बीएड उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी रविवारी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : डीएड व बीएड उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी रविवारी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी परीक्षेत आठ हजार पैकी ५०८ परिक्षार्थी अनुपस्थित होते. जिल्ह्यातील २३ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा झाली.दोन सत्रात परीक्षाथीर्नी ही परीक्षा दिली. सकाळच्या सत्रात १२ तर दुपार सत्रात ११ परीक्षा केंद्रांवर परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक परीक्षा केंद्रावर संबंधीत शाळेचे प्राचार्य तथा मुख्याध्यापक यांना केंद्रसंचालक म्हणून नेमणूक देण्यात आली होती. तर शिक्षण विस्तार अधिकारी यांना प्रत्येक केंद्रासाठी एक याप्रमाणे सहाय्यक परिरक्षक म्हणून नेमणूक देण्यात आली होती. प्रत्येक चार परीक्षा केंद्रांसाठी गटशिक्षणाधिकारी दर्जाचे एक झोनल अधिकारी नियुक्त करण्यात आले होते. भरारी पथकाअंतर्गत प्राचार्य डाएट, माध्यमिक शिक्षणाधिकारी तसेच निरंतर शिक्षणाधिकारी असे एकूण तीन भरारी पथक नेमण्यात आले होते.या परीक्षेस सकाळ सत्रात पेपर क्रमांक एकला नोंदणीकृत पाच हजार ६३ पैकी ४,७८२ परीक्षार्थी उपस्थित होते तर २८१ परीक्षार्थी अनुपस्थित होते. तसेच दुपार सत्रात पेपर क्रमांक दोनला नोंदणीकृत ३,७३५ पैकी ३,५०८ परीक्षार्थी उपस्थित होते तर २२७ परीक्षार्थी अनुपस्थित होते.परीक्षेचे संयोजन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा जी. सी. यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक शिक्षणाधिकारी भानुदास रोकडे तसेच प्राथमिक उपशिक्षणाधिकारी डॉ . युनूस पठाण यांनी केले.दरम्यान, यापूर्वी झालेल्या परिक्षांमधील गैरप्रकार लक्षात घेता जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी विशेष काळजी घेतली होती.