शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
4
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
5
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
6
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
7
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
8
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
9
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
10
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
11
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
12
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
13
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
14
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
15
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
16
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
17
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
18
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
19
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
20
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
Daily Top 2Weekly Top 5

शहाद्यात १०० खाटांचे विलगीकरण कक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 11:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : जगभरात कोरोना व्हायरस या आजाराच्या प्रादुर्भाव वाढत असून त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी शहादा तालुका आपत्ती ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : जगभरात कोरोना व्हायरस या आजाराच्या प्रादुर्भाव वाढत असून त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी शहादा तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत शहादा येथील शासकीय आश्रमशाळेत १०० खाटांचे विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आले आहे. यासाठी आवश्यक या सुविधा पुरविण्यासाठी पुन्हा प्रयत्न असल्याचे प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे यांनी सांगितले.यानिमित्त घेण्यात आलेल्या बैठकीत प्रांताधिकारी डॉ.गिरासे, तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी उपविभागीय पोलिस अधिकारी पुंडलिक सपकाळे, पोलीस निरीक्षक किसनराव पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र पेंढारकर, मुख्याधिकारी डॉ.राहुल वाघ, गट विकास अधिकारी गोसावी, गटशिक्षण अधिकारी उषा पेंढारकर आदी उपस्थित होते.कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शहादात तालुका स्तरावर ती तालुका प्रशासनाकडून विविध उपाययोजना सुरू आहे. दरम्यान कोरोना आजाराबाबत लोकांमधील संभ्रम दूर करण्यासाठी शहरासह ग्रामीण भागात व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. या माध्यमातून ठिकाणी फलके व ध्वनिक्षेपकाच्या आधारे प्रचार केला जात आहे. त्यात माध्यमातून जनतेने घाबरू नये असे आवाहन करण्यात येत आहे.शहादा शहर व तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहादे शहरापासून चार किलोमीटर अंतरवरील मामाच्या मोहीदे शिवारात शासकीय तंत्र निकेतन, शासकीय आश्रमशाळा व आयटीआय या तीन ठिकाणी १०० खाटांचे कोरोना टाईम कक्ष स्थापन करण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थिती उद्वल्यास या ठिकाणी पुन्हा शंभर बेडची व्यवस्था करण्याचाही निर्णय घेण्यात आला. तेथे परगावाहून येणाऱ्या प्रवाशांचे देखील आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.