शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
3
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
4
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
5
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
6
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
7
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
8
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
9
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
10
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
11
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
12
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
13
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
14
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
15
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
16
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
17
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
18
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
19
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
20
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
Daily Top 2Weekly Top 5

२०२० मध्ये कोरोनाचा हाहाकार फोफावणाऱ्या डेंग्यूनेही पत्करली हार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:08 IST

जिल्ह्यात डेंग्यू सदृश आजारांवर मात करण्यासाठी जिल्हा हिवताप विभागाकडून सातत्याने सर्वेक्षण मोहीम राबवण्यात येते. २०१२ ते २०२० या वर्षात ...

जिल्ह्यात डेंग्यू सदृश आजारांवर मात करण्यासाठी जिल्हा हिवताप विभागाकडून सातत्याने सर्वेक्षण मोहीम राबवण्यात येते. २०१२ ते २०२० या वर्षात डेंग्यूचा आढावा घेतल्यास २८८ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. २०१२ मध्ये दोन तर २०१३ मध्ये ३ अशा एकूण पाच जणांचा बळी गेल्यानंतर सातत्याने डेंग्यूचे सर्वेक्षण सुरू आहे. यातून २०१९ हे वर्ष वगळता इतर वर्षात मात्र डेंग्यू नियंत्रणात असल्याचे दिसून आले होते. एप्रिल २०२० मध्ये जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर मात्र डेंग्यूचे रुग्ण आढळून येण्याची संख्या अचानक कमी झाल्याचे समोर आले आहे. २०२० या संपूर्ण वर्षात केवळ ३०१ संशयित रुग्ण आढळून आल्याचे हिवताप विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. यातील आठ जण डेंग्यू पाॅझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्यावर उपचार पूर्ण करण्यात आले होते. जिल्ह्यात डेंग्यू बाधितांची संख्या अचानक कमी झाली असली तरीही विभागाकडून सर्वेक्षण मात्र सुरू असल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डाॅ. रवींद्र ढोल यांच्याकडून देण्यात आली आहे.

किरकोळ लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास येऊ शकतात अडचणी

एडिस डासाने चावा घेतल्यानंतर साधारण पाच ते सहा दिवस विविध लक्षणे जाणवल्यास डेंग्यूची तपासणी करुन घेण्याचे हिवताप विभागाकडून सूचित केले जाते. यात संपूर्ण अंगदुखी आणि सांधेदुखीची तक्रार समोर येते.

बाधित रुग्णाला वारंवार ताप येण्यास सुरुवात होते. तापाचे प्रमाण अधिक असल्यास तातडीने डेंग्यूची चाचणी करण्याचा सल्ला विभागाकडून देण्यात येतो. तापादरम्यान डोळ्यांच्या खोबणीत दुखण्याचे प्रमाणही जाणवते.

ताप आणि अंगदुखी जाणवत असतानाच पाच ते सात दिवस अंगावर लाल रंगाचे चट्टे येण्याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येते. यातून डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट होते. यामुळे तातडीने योग्य ते उपचार घेतल्यास डेंग्यू बरा होतो.

जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण कमी असले तरी डेंग्यूसदृश तापाचे रुग्ण मात्र सातत्याने आढळून येतात. २०१९ या वर्षात ताप असलेले २००२ संशयित रुग्ण समोर आले होते.

डेंग्यू नियंत्रणासाठी जिल्हा हिवताप विभागाकडून सातत्याने मोहिमांचे आयोजन करण्यात येते. यासाठी आरोग्य सेवक, हिवताप कर्मचारी तसेच आशा स्वयंसेविका यांची नियुक्ती करण्यात येते. या पथकांकडून घरोघरी भेटी देत, पाहणी करण्यात येते. यावेळी साठा केलेल्या पाण्यात एडीस डासाची पैदास करणाऱ्या अळ्यांचे सर्वेक्षण करण्यात येते. अळ्या आढळून आल्यास त्याठिकाणी ॲबेटिंग करण्याचा उपक्रम पार पाडण्यात येतो. जिल्हा हिवताप विभागाकडून सातत्याने यावर कामकाज करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान जिल्ह्यात नवापूर, नंदुरबार आणि शहादा तालुक्यात डेंग्यूसदृश रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण हे सर्वाधिक असल्याची माहिती देण्यात आली आहे.