शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
3
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
4
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
5
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
6
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
7
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
8
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
9
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
10
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
11
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
12
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
13
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
14
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
15
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
16
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
17
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
18
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
19
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
20
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

16 पोल्ट्रीतील 18 लाख अंडी केली नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 12:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : परिसरामध्ये पाचव्या दिवशी ६ पोल्ट्रीतील ५१ हजार कुक्कुट पक्षी नष्ट करण्यात आले आहे. १६ बर्ड फ्लूग्रस्त पोल्ट्रीत दोन टप्प्यात १८ लाख ७७ हजार ८४५ अंडी नाश करण्यात आली आहे. गुरूवारी पुन्हा चार अहवाल बर्ड ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नवापूर : परिसरामध्ये पाचव्या दिवशी ६ पोल्ट्रीतील ५१ हजार कुक्कुट पक्षी नष्ट करण्यात आले आहे. १६ बर्ड फ्लूग्रस्त पोल्ट्रीत दोन टप्प्यात १८ लाख ७७ हजार ८४५ अंडी नाश करण्यात आली आहे. गुरूवारी पुन्हा चार अहवाल बर्ड फ्लू एच५एन८ या विषाणू बाधित आले आहे. यामुळे नवापूर शहरातील आतापर्यंत २० पोल्ट्रीतील अहवाल पॉझीटीव्ह आले आहे. उर्वरित सात पोल्ट्रीतील अहवाल पाठवण्यात आले आहे. सर्व पोल्ट्रीतील कुकुट पक्षी व अंडी नष्ट करण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाला करावे लागणार आहे.

दररोज अहवाल पॅाझिटिव्ह येत असल्याने व्यवसायिकांची चिंता वाढली आहे. गुरुवारी सहा पोल्ट्री फार्म मध्ये किलींग ऑपरेशन दिवसभरामध्ये राबविण्यात आले.

यात मुस्तफा पोल्ट्रीत सात हजार ६०९, सफा पोल्ट्री ६ हजार ७७, न्यू शांती पोल्ट्री नऊ हजार ९२७, जस पोल्ट्रीत ५ हजार ३९८ शाहीन पोल्ट्री १६ हजार २१९, एफसन्स पोल्ट्री ६ हजार ११ असे एकूण सहा पोल्ट्रीत दिवसभरात ५१ हजार २४१ पक्षी नष्ट करण्यात आले आहे. आतापर्यंत २७ पोल्ट्री मधून १६ पोल्ट्री चे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

१६ पोल्ट्रीतील सर्व पक्षी नष्ट करण्याची मोहीम राबवण्यात येत आहे. आतापर्यंत तीन लाख ७९ हजार ४५४ पक्षी नष्ट करण्यात आले आहे. अशी माहिती तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी दिली आहे.

गुरुवारी २७ पोल्ट्रीमधील सर्वे अंडीचे मोजमाप व पंचनामा करून अंडी नाश केली. १६ बर्ड फ्लूग्रस्त पोल्ट्रीत दोन टप्प्यात १८ लाख ७७ हजार ८४५ अंडी नाश करण्यात आलीत. पहिल्या टप्प्यातील श्रेयस पोल्ट्री, २३ हजार ६९५ अंडी मुस्तुफा पोल्ट्री-(पिंपळनेर रोड ) २ लाख ३७ हजार,मुस्तुफा (लहान चिंचपाडा)००, परवेज पोल्ट्री २७ हजार ८१०, सफा पोल्ट्री २६ हजार ७७०,शाईन पोल्ट्री ४८ हजार ७००,डायमंड पोल्ट्री ६ लाख १७ हजार ८२०, न्यू डायमंड ३३ हजार ३९० एकूण ९ लाख ८१ हजार ८८५ अंडी नाश करण्यात आलीत. दुसऱ्या टप्प्यातील न्यू शांती पोल्ट्री ७२ हजार १२०,जस पोल्ट्री ९३ हजार ५१०,शिश पोल्ट्री ७४ हजार ६१०,सहयोग पोल्ट्री २ लाख ७२ हजार ५००, एप्सन पोल्ट्री ३२ हजार ३४०,वासिम पोल्ट्री १ लाख २६ हजर ९६०,पालावाला पोल्ट्री २ लाख ६९ हजार ९७०, आमलीवाला पोल्ट्री १३ हजार ९५० असे  एकूण आठ पोल्ट्रीतील ८ लाख ९५ हजार ९६० अंडी नाश करण्यात आलीत.

दिवसभरात ९५ पथकाने १६ बर्ड फ्लू ग्रस्त पोल्ट्रीतील १८ लाख ७७ हजार ८४५ अंडी नाश करून खड्ड्यात पुरवण्यात आली आहे. उर्वरित ११ पोल्ट्रीतील अंडी अहवाल आल्यानंतर टप्प्या टप्प्याने नाश करण्यात येणार असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागातील सूत्रांनी दिली आहे.

 

सात अहवालांची आता प्रतिक्षा...

नवापूर तालुक्यातील पायोनियर (व्होरा) पोल्ट्री ,पेरडाईज पोल्ट्री,रिची पोल्ट्री, निशा पोल्ट्री,शोली पोल्ट्री,गॅलेक्सी पोल्ट्री ,अशरफ पोल्ट्री या सात पोल्ट्रीचे ११ नमुने आयसीएआर भोपाल येथे पाठविण्यात आले आहे.पुन्हा चार अहवाल बर्ड फ्लू एच५ एन८ पॉझीटीव्ह गुरूवारी पुन्हा चार अहवाल बर्ड फ्लू एच ५ एन ८ या विषाणू बाधित आजाराची लागण सकीस्मा पोल्ट्री,हुस्ना पोल्ट्री ,जनता पोल्ट्री आणि डाॅन बी असे चार पोल्ट्रीचे अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत, आतापर्यंत २७ पैकी २० अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. सात पोल्ट्रीचे अहवाल भोपाल प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यातील किती अहवाल पॉझीटीव्ह येतात याकडे जिल्हा प्रशासान व पोल्ट्री व्यावसायिकांचे लक्ष लागून आहे.

नवापूर तालुक्यातील एकही बाॅयलर फार्म नाही सर्व अंडी देणारी कल्स कोंबडी आहेत. बॉयलर कोंबड्या नाशिक जिल्ह्यातून व गुजरात राज्यातून मोठ्या प्रमाणात नवापूर शहरात आणले जातात. नवापूर शहरात सर्वच अंडी देणारी पोल्ट्री फार्म आहेत. ज्यावेळेस कोंबडी अंडी देणे बंद करते त्या वेळेसच त्या कोंबडी ची विक्री व्यासायीक करीत असतात.