सीमा तपासणी नाक्यावरचे १६ कर्मचारी ‘क्वारंटाईन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 21:18 IST2020-04-27T21:17:59+5:302020-04-27T21:18:06+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नवापुर : तालुक्यातील बेडकी येथील सीमा तपासणी नाक्यावर तैनात आरोग्य सहायक धुळे येथील कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कात ...

16 quarantine personnel at border checkpoints | सीमा तपासणी नाक्यावरचे १६ कर्मचारी ‘क्वारंटाईन’

सीमा तपासणी नाक्यावरचे १६ कर्मचारी ‘क्वारंटाईन’

लोकमत न्यूज नेटवर्क
नवापुर : तालुक्यातील बेडकी येथील सीमा तपासणी नाक्यावर तैनात आरोग्य सहायक धुळे येथील कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कात आल्याने एकच खळबळ उडाली आहे़ या कर्मचाऱ्यासह १६ जणांना आरोग्य विभागाने क्वारंटाईन करत त्यांचे स्वॅब घेतले आहेत़
महाराष्ट्र-गुजरात सीमा तपासणी नाक्यावर आरोग्य, पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभाग यांचे पथक तैनात आहे़ दरम्यान येथे तैनात आरोग्य कर्मचाºयाने काही दिवसांपूर्वी धुळे येथील कोरोनाबाधित महिलेला गाडीत बसण्यास मदत केली होती़ ही माहिती संबधित कर्मचाºयाने आरोग्य विभागाला न देताच बेडकी येथे काम सुरु केले होते़ यातून या कर्मचाºयाचा येथे नियुक्त सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस कर्मचारी, आरोग्य कर्मचारी अशा १६ जणांसोबत संपर्क राहिला असल्याची माहिती गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांच्याकडून देण्यात आली आहे़
तहसीलदार उल्हास देवरे, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ़ हरीश्चंद्र कोकणी यांच्या पथकाने तात्काळ नवापूर तपासणी नाक्यावर भेट देत संबधित आरोग्य कर्मचाºयासह इतरांचे स्वॅब नमुने घैत त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठवण्याच्या सूचना दिल्या होत्या़

Web Title: 16 quarantine personnel at border checkpoints