म्हसावद येथे मानसिक महाआरोग्य शिबिरात 150 मनोरुग्णांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 13:08 IST2019-11-29T13:08:20+5:302019-11-29T13:08:30+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा रुग्णालयाच्या मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत म्हसावद ता़ शहादा येथे मानसिक महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात ...

150 Psychiatric Investigations at Mental Illness Camp at Mhasavad | म्हसावद येथे मानसिक महाआरोग्य शिबिरात 150 मनोरुग्णांची तपासणी

म्हसावद येथे मानसिक महाआरोग्य शिबिरात 150 मनोरुग्णांची तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा रुग्णालयाच्या मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत म्हसावद ता़ शहादा येथे मानसिक महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होत़े या शिबिरात 150 मनोरुग्णांची तपासणी करण्यात आली़ 
मंगळवारी म्हसावद ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ रघुनाथ भोये व अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्स डॉ़ क़ेडी़सातपुते यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम पार पडला़ या शिबिराचे उद्घाटन तहसीलदार मिलींद कुलकर्णी यांच्याहस्ते करण्यात आल़े प्रसंगी मानसोपचार तज्ञ डॉ़ वंदना सोनोने, डॉ़ विजय पवार, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ़ जी़एस़शेटय़े, डॉ़ चौधरी, डॉ़ भूषण पाटील हे उपस्थित होत़े प्रसंगी मानसोपचार तज्ञ डॉ़ वंदना सोनोने यांनी मानसिक आजार व त्यावरील उपचार याबाबत उपस्थित रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना माहिती देऊन मासिक आरोग्य विनामूल्य मदत वाहिनी क्रमांक 104 ला संपर्क करुन समुपदेश करुन घेण्याबाबतही सांगितल़े डॉ़ सोनोने व डॉ़ पवार यांनी या शिबिरादरम्यान 32 मनोरुग्ण व 70 जुन्या रुग्णांची तपासणी करुन त्यांच्यावर औषधोपचार केल़े 
या कार्यक्रमांतर्गत म्हसावद येथे प्रत्येक महिन्याच्या तिस:या मंगळवारी मानसिक रुग्ण तपासणी विभाग सुरु करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली़ 
तहसीलदार मिलींद कुलकर्णी यांनी उपस्थितांना सुदृढ आरोग्यासाठी मानसिक आरोग्य सक्षम असे महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट केल़े मानसिक आजार कोणालाही होऊ शकतो त्यात कोणताही भेदभाव होत नाही़ यामुळे या आजाराविषयी कोणताही संकोच न बाळगता मानसोपचार तज्ञांकडून सल्ला व मार्गदर्शन घेतले पाहिजे याविषयी त्यी चर्चा केली़ 
चिकित्सक मानसशास्त्रज्ञ प्रविण डोंगरे यांनी प्रास्ताविक केल़े सूत्रसंचालन करुणा चौधरी यांनी केल़े शिबिरासाठी जयंत वळवी, जामसिंग पावरा, रमश्या वसावे, विद्या बुंदेले आदींनी परिश्रम घेतल़े 
 

Web Title: 150 Psychiatric Investigations at Mental Illness Camp at Mhasavad