15 हजार डोस शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:32 IST2021-04-09T04:32:37+5:302021-04-09T04:32:37+5:30

नंदुरबार : राज्यात एकीकडे लसींचा तुटवडा असल्याने कोरोना लसीकरण थांबले आहे, तर दुसरीकडे नंदुरबार जिल्ह्यात उपलब्ध लसींपैकी सुमारे १५ ...

15 thousand dose balance | 15 हजार डोस शिल्लक

15 हजार डोस शिल्लक

नंदुरबार : राज्यात एकीकडे लसींचा तुटवडा असल्याने कोरोना लसीकरण थांबले आहे, तर दुसरीकडे नंदुरबार जिल्ह्यात उपलब्ध लसींपैकी सुमारे १५ हजारावर लसी अद्यापही शिल्लक आहेत. आजच्या स्थितीत सुमारे ५९ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे.

नंदुरबार जिल्ह्यासाठी राज्य शासनाने तूर्त ३७ हजार ५०० लसी उपलब्ध करून दिल्या आहेत. यात २९ हजार ४०० कोविशिल्डचे डोस, तर कोव्हॅक्सिनचे ८१०० डोसचा समावेश आहे. कालअखेर यातील सुमारे २२ हजार लसींचा वापर झाला आहे. यात पहिला डोस २० हजार ८१७ नागरिकांना देण्यात आला आहे, तर दुसरा डोस केवळ ९७४ नागरिकांना देण्यात आला आहे. याची सरासरी टक्केवारी सुमारे ५९ टक्के होते. संख्येच्या दृष्टीने तुलनात्मक विचार करता जिल्ह्यात आजअखेर सुमारे १५ हजारावर डोस शिल्लक आहेत.

शेजारच्या धुळे व जळगाव जिल्ह्यात एकीकडे लसीकरणासाठी लशी मिळत नसताना दुसरीकडे नंदुरबार जिल्ह्यात लशी शिल्लक आहेत.

Web Title: 15 thousand dose balance