शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
6
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
7
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
8
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
9
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
10
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
11
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
12
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
13
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
14
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
15
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
16
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
17
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
18
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
19
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
20
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
Daily Top 2Weekly Top 5

असलीच्या राजेशाही होळीत भरला राजकारणाचा ‘रंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 14:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सातपुड्यात सध्या होळीचा फिवर चढला असून संपुर्ण सातपुडा सांस्कृतिक रंगात बुडाला आहे. या होळी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सातपुड्यात सध्या होळीचा फिवर चढला असून संपुर्ण सातपुडा सांस्कृतिक रंगात बुडाला आहे. या होळी उत्सवातील अनोखी होळी म्हणजे दिवसा पेटणारी आदिवासी विकास मंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी यांची असली येथील होळी. रविवारी या होळीत धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील राजकीय कार्यकर्त्यांनीही सहभाग घेवून होळीत राजकारणाचा ‘रंग’ भरला.सातपुड्यात गेल्या चार दिवसांपासून होळी उत्सव सुरू झाला आहे. रोज विविध गावात वेळापत्रकानुसार होळी उत्सव साजरा होत आहे. ही होळी रात्री साजरा करण्याची परंपरा आहे. रात्रभर परिसरातील विविध गावातील पथके एकत्र येवून पारंपारिक नृत्य करतात आणि पहाटे होळी पेटवितात. याला अपवाद मात्र आदिवासी विकास मंत्री के.सी.पाडवी यांची होळी आहे. त्यांच्या असली, ता.धडगाव या गावी गेल्या तीन वर्षांपासून ते मानाची होळी साजरा करतात. विशेष म्हणजे ती दिवसा असते. यावर्षी के.सी. पाडवी यांना राज्यमंत्रीमंडळात आदिवासी विकास मंत्रीपद मिळाल्याने सहाजीकच त्यांच्या या होळीला वेगळा रंग व उत्साहही होता. त्यांच्या निवासस्थाना शेजारीच भव्य मंडप टाकून पाहुण्यांची सुविधा करण्यात आली होती. घरालाही वेगळ्या पद्धतीने सजविण्यात आले होते. होळीसाठी खास करून राजकारणातील कार्यकर्त्यांची गर्दी एरव्हीपेक्षा या वर्षी जास्त होती.जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सिमा वळवी, माजी मंत्री अ‍ॅड.पद्माकर वळवी, जि.प.चे बांधकाम सभापती अभिजीत पाटील, राष्टÑवादीचे प्रदेश सचिव सुरेश सोनवणे, लोक संघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे, धुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव दहिते, जिल्हा परिषद सदस्य सी.के.पाडवी, रतन पाडवी यांच्यासह धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच राजकीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अधिकारी वर्गातही आदिवासी विकास विभागाचे अपर सचिव ढोके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, नंदुरबारचे प्रकल्प अधिकारी वसुमना पंत, तळोद्याचे प्रकल्प अधिकारी अविशांत पांडा यांच्यासह दोन्ही जिल्ह्यातील विविध खात्याचे अधिकारी आवर्जून उपस्थित होते.दुपारी चार वाजेच्या सुमारास स्वत: आदिवासी विकास मंत्री के.सी.पाडवी पारंपारिक होळी नृत्याची वेशभूषा करून लोकांमध्ये आले आणि होळीचा ज्वर चढला. होळी मैदानात परिसरातील हजारो लोक उपस्थित होते. तब्बल दोन तास यावेळी होळी नृत्याचा सांस्कृतिक रंगात परिसर न्हाऊन निघाला होता.परिसरातील गावांसह धुळे जिल्ह्यातील विविध ठिकाणचे पथके खास आपापल्या पारंपारिक वेशभूषेत तेथे दाखल झाले होते. त्यामुळे यंदाच्या या होळीत प्रचंड उत्साहाचा रंग होता.त्यात राजकीय कार्यकर्त्यांनी देखील होळी नृत्याचा ताल व ठेका धरण्याचा प्रयत्न केल्याने राजकारणाचे हे वर्तूळ लक्षवेधी ठरत होते. सायंकाळी सहाच्या सुमारास पारंपारिक पद्धतीने होळी पेटविण्यात आली.