शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
3
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
4
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
5
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
6
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
7
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
8
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
9
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
10
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
11
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
12
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
13
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
14
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
15
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
16
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
17
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
18
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
19
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
20
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
Daily Top 2Weekly Top 5

सोमवारी दिवसभरात १२३ अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 13:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक रणधुमाळीला शासकीय सुट्यांमुळे ब्रेक लागून अर्ज दाखल करणे थांबले होते. सोमवारी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक रणधुमाळीला शासकीय सुट्यांमुळे ब्रेक लागून अर्ज दाखल करणे थांबले होते. सोमवारी शासकीय कार्यालये पुन्हा सुरु झाल्यानंतर दिवसभरात १२३ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यात सर्वाधिक अर्ज हे  नवापूर तालुक्यातून दाखल झाले. अक्कलकुवा तालुक्यात एक, धडगाव १६, तळोदा ७, शहादा २७, नंदुरबार २२ तर नवापूर तालुक्यात १४ ग्रामपंचायतींत निवडणूक कार्यक्रम घोषित आहे. २३ पासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली होती. दरम्यान पहिल्या दोन दिवसात केवळ १३ अर्ज दाखल झाले होते. नाताळ तसेच शनिवार आणि रविवार असे तीन दिवस सुटीचे आल्याने सोमवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली. यात धडगाव तालुक्यातून १७, तळोदा २०, शहादा ०५, नंदुरबार १९ तर नवापूर तालुक्यातून ६२ अर्ज दाखल करण्यात आले. अर्ज दाखल करण्यासाठी अक्कलकुवा वगळता सर्वच पाच तालुका तहसीलदार कार्यालयांमध्ये गर्दी झाल्याचे दिसून आले होते. ऑनलाईन अर्ज दाखल करण्यात आल्यानंतर अर्जाची पोचपावती देण्यासाठी इच्छुक उमेदवार कक्षांमध्ये पोहोचत होते. 

८७ ग्रामपंचायतींच्या एकूण ७६५ सदस्यपदांच्या जागांसाठी ही निवडणूक होत आहे. एकूण २८३ प्रभागातून उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत. यासाठी ७३ हजार ७०२ पुरुष, ७२ हजार ८५२ महिला तर दोन इतर मतदार मतदान करणार आहेत. एकूण एक लाख ४६ हजार ५५५ मतदार या निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. दरम्यान अर्ज दाखल करण्याची मदुत ३० रोजी संपणार असल्याने इच्छुक उमेदवारांची अर्ज दाखल करण्यासाठी मोठी धावपळ होत असल्याचे दिसून आले.