शहाद्यातील रक्तदान शिबिरात १०२ जणांनी केले रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:30 IST2021-07-29T04:30:21+5:302021-07-29T04:30:21+5:30

देश व राज्यात उद्भवलेली नैसर्गिक आपत्ती आणि कोरोना विषाणू संक्रमणाची महामारी यामुळे परिस्थिती गंभीर झाली असून, माझ्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक ...

102 people donated blood in Shahadya blood donation camp | शहाद्यातील रक्तदान शिबिरात १०२ जणांनी केले रक्तदान

शहाद्यातील रक्तदान शिबिरात १०२ जणांनी केले रक्तदान

देश व राज्यात उद्भवलेली नैसर्गिक आपत्ती आणि कोरोना विषाणू संक्रमणाची महामारी यामुळे परिस्थिती गंभीर झाली असून, माझ्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक बाबींवर खर्च न करता समाजोपयोगी कार्य करून वाढदिवस साजरा करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत शहादा शिवसेनेतर्फे रक्तदान शिबिर आयोजित केले होते. याप्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हा संघटक मधुकर मिस्तरी, शहरप्रमुख रोहन माळी, उप तालुका प्रमुख उत्तम पाटील, डॉ. सागर पाटील, दगडू वेंदे, अविनाश पाटील, बापू सूर्यवंशी, माजी नगरसेवक विनोद चौधरी, राजमल जैन, उपशहर प्रमुख गुलाब सुतार, इद्रीस मेमन, हृषीकेश शिवदे, दीपक खेडकर, जावेद उस्ताद, इम्रान शेख, वाजिद अली, बाबा पठाण, अल्मास बेलदार, शोएब मंत्री, मोईन खान, शाकिब शेख, गुड्डू खान, जावेद शेख, सिराज बागवान, इरफान मन्सुरी, शहीद पेंटर यांसह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन अब्दुल कादीर व सहकाऱ्यांनी केले.

शंभर टक्के मुस्लीमबहुल वस्तीत शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात १०२ रक्तदात्यांनी रक्तदान करून विक्रम केला. विशेष म्हणजे शिवसेना ही मुस्लीमविरोधी असल्याचा अपप्रचार अनेक वेळा झाला असतानाही या रक्तदान शिबिरात जाती-धर्माच्या भिंती ओलांडून मुस्लीम नागरिकांसह सर्वधर्मीयांनी रक्तदान करून इतिहास घडविला आहे.

Web Title: 102 people donated blood in Shahadya blood donation camp