शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

Women's Day Special : अंगणवाडीतील २१ वर्षांच्या कष्टाचे झाले सोने : अलका चिंतामणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 12:04 IST

मुलगी शिक्षिका तर मुलगा चीनमध्ये इंजिनिअर

- विशाल सोनटक्के

नांदेड : नवऱ्याची खाजगी नोकरी, त्यामुळे उत्पन्न अत्यल्प, त्यातच दोन चिमुकल्यांचे शिक्षण अशा स्थितीत कुटुंबाचा गाडा कसा हाकायचा, असा प्रश्न होता़ मात्र संकटाच्या काळातही न डगमगता परिस्थितीचा धैर्याने सामना केला़ घराला आर्थिक हातभार लावण्यासाठी विद्यार्थ्यांची शिकवणी सुरू केली़ त्यानंतर अंगणवाडीत रुजू झाले़ आज दोन्ही मुले उच्चशिक्षण घेऊन स्वत:च्या पायावर उभी आहेत. अंगणवाडीत कार्यकर्ती म्हणून केलेल्या २१ वर्षांच्या कष्टाचे सोने झाल्यासारखे वाटते़, अशी प्रतिक्रिया आहे अलका चिंतामणी यांची. 

नांदेड नजीकच्या बळीरामपूर अंगणवाडी क्रमांक ४ मध्ये कार्यरत असलेल्या अलका यांचे शिक्षण इयत्ता ११ वीपर्यंतचे़ पती खाजगी कंपनीत काम करीत होते़ एक मुलगा आणि मुलगी या दोघांच्या शिक्षणाची जबाबदारी पेलताना कसरत व्हायची. त्यामुळे परिसरातील विद्यार्थ्यांचे क्लासेस घेण्यास सुरुवात केली़ पुढे १९९८ साली अंगणवाडीमध्ये काम करण्याची संधी मिळाली. घरातील कामे, मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देणे आणि त्यानंतर पुन्हा चार तास अंगणवाडीत जाऊन शिकविताना कमालीची धावपळ व्हायची. मात्र कुटुंबाला उभे करण्यासाठी नोकरीची आवश्यकता होती़ त्यामुळे न थकता नियमित अंगणवाडीला जाऊ लागले़ त्यावेळी अवघे २०० रुपये मानधन मिळायचे़ मात्र याच मानधनातून कुटुंबाच्या गरजा भागत असल्याने ते माझ्यासाठी लाखमोलाचे होते. 

सकाळी ८ ते १२ अशी अंगणवाडीची वेऴ त्यामुळे भल्या पहाटे उठून दोन्ही मुलांना शाळेसाठी तयार करायचे, त्यांच्या जेवणाचा डबा झाल्यानंतर मी अंगणवाडीसाठी निघायचे़ दुपारी अंगणवाडी सुटल्यानंतर पुन्हा मुलांच्या ओढीने घराकडे निघायचे़ अंगणवाडीतील मानधन अल्पसे असल्याने दुपारनंतर काही विद्यार्थ्यांचे क्लासेस घ्यायचे़ अशाच धावपळीत साधारण २१ वर्षांचा काळ लोटला़ आज राहुल अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन चीनमधील शांघाय येथील एका नामांकित कंपनीत सप्लाय मॅनेजर म्हणून काम करतो, तर मुलगी रुपाली आज परभणी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहे़ लहान असताना हीच रुपाली माझ्याबरोबर या अंगणवाडीत येऊन मी विद्यार्थ्यांना कशी शिकविते ते कौतुकाने पाहायची़ आज हे दोघेही स्वत:च्या पायावर उभे आहेत, याचा अभिमान वाटतो़ मुले स्थिरस्थावर झाल्यानंतर अंगणवाडीचे काम सोडून आमच्यासोबत राहा, अशी विनंती करतात़ मात्र इतकी वर्षे मी अंगणवाडीत कार्यरत राहिले़ या अंगणवाडीने मला माझ्या कुटुंबाला आधार दिला़ ती सोडायला नको वाटते़, असे त्या आवर्जून सांगतात़ 

परिस्थितीला शरण जाऊ नकाअंगणवाडी कार्यकर्तींना मिळणारे मानधन कमी आहे़ या सर्व कार्यकर्त्या आर्थिक दुर्बल घटकांतून आलेल्या असतात़ त्यामुळे घरच्या अडीअडचणीही असतात़ शासनाने या कार्यकर्तींना समाधानकारक वेतन देण्याची आवश्यकता आहे़ असे झाल्यास वाड्या-वस्त्यांवरील चिमुकल्यांना अधिक चांगले शिक्षण मिळेल. महिलांनी परिस्थितीसमोर हार न मानता कार्यरत राहिले पाहिजे़ तुम्ही चांगले काम करीत असाल तर निश्चितपणे तुमचे कुटुंब, समाज तुमच्या पाठीशी उभा राहतो, याचा अनुभव मी अनेकदा घेतल्याचेही अलका चिंतामणी सांगतात.

टॅग्स :Women's Day Specialजागतिक महिला दिनWomenमहिलाAurangabadऔरंगाबादNandedनांदेड