शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
4
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
5
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
7
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
8
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
9
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
10
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
11
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
13
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
14
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
16
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
17
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
18
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

पिवळ्या सोन्यापुढे पांढरे सोने पडले फिके; कापसापेक्षा सोन्याला दहा पटीने अधिक दर

By रामेश्वर बालाजीराव काकडे | Published: April 12, 2024 2:53 PM

शेतकऱ्यांना पीक लागवडीपासून उत्पादन हाती येईपर्यंत भरमसाट खर्च करावा लागतो. त्या तुलनेत खर्च वजा जाता पदरात काहीच पडत नसल्याची स्थिती आहे.

नांदेड : शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून ओळख असलेल्या कापसाचे भाव यावर्षी साडेसात हजारांपर्यंतच स्थिरावलेले आहेत. असे असताना पिवळ्या सोन्याने मात्र गगनभरारी घेतली असून भाव झपाट्याने वाढले. आजघडीला नांदेडच्याबाजारपेठेत कापसापेक्षा सोन्याला दहा पटीने अधिक दर मिळताहेत. त्यामुळे पिवळ्या सोन्यापुढे शेतकऱ्यांचे पांढरे सोने मात्र फिके पडल्याचे दिसून येते.

शेतकऱ्यांना पीक लागवडीपासून उत्पादन हाती येईपर्यंत भरमसाट खर्च करावा लागतो. त्या तुलनेत खर्च वजा जाता पदरात काहीच पडत नसल्याची स्थिती आहे. दुसरीकडे आभूषण म्हणून सोन्याला महिला अधिक पसंती देतात. गुंतवणूक म्हणूनही सोन्याची खरेदी केली जाते. दिवसेंदिवस दर वाढत असले तरी सोन्याची उलाढाल काही कमी झालेली नाही. एकेकाळी प्रतितोळे सोने आणि प्रतिक्विंटल कापसाचे भाव सारखेच होते. पण, कालांतराने सोन्याचे भाव वाढत गेले अन् कापसाचे भाव अनेक वर्ष स्थिरावलेलेच राहिले.

नांदेड जिल्ह्यात २०१० मध्ये कापसाचे भाव दोन हजार रुपये इतके होते. तर सोन्याचे भाव १६,५०० रुपये होते. पण मागील १५ वर्षांतच कापसाचे भाव तीन पटीने तर सोन्याचे भाव साडेचार पटीने वाढल्याचे पाहायला मिळते. २०१२ मध्ये कापसाचे भाव ३,१०० रुपये तर सोन्याचे भाव २८ हजारांवर पोहोचले होते. यावरून मागील दहा वर्षांत कापसापेक्षा सोन्याचे भाव अधिक पटीने आणि झपाट्याने वाढल्याने सोने खरेदी सर्वसामान्य, मध्यमवर्गीयांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. मिळणारे उत्पन्न आणि होणारा खर्च यातील तफावत वाढत गेली आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी होत गेली. जेवढा कापूस अधिक तेवढ्या आत्महत्या अधिक असे चित्र राज्यात दिसू लागले.

कापसाचे भाव निम्यावरचकापसाला मागील तीन वर्षांपूर्वी १३ हजारांपेक्षा अधिक भाव मिळाला होता.मात्र, त्यानंतर दरवर्षी कापसाचे भाव उतरत गेले आणि सध्या साडेसात हजारांहून अधिक दर वाढले नाहीत. त्या तुलनेत सोन्याच्या दराने मात्र मोठी झेप घेतली आहे. त्यामुळे तीन वर्षांत कापसाचे भाव वाढण्याऐवजी निम्यावरच आले आहेत.

कापसाचा उताराही घटलाजिल्ह्यात यावर्षी कापसाच्या पिकाला पावसाचा खंड व नंतर अवकाळी पावसाचा फटका बसला. यामुळे फळधारणा कमी होऊन नंतर बोंडे काळवंडल्याने कापसाच्या उत्पादनात मोठी घट येत आहे. अनेक शेतकऱ्यांना एका बॅगला तीन ते चार क्विंटलच कापूस निघत असल्याने त्यांनी लागवडीसाठी टाकलेला खर्चही पदरातून करावा लागला आहे.

काही राज्यात एमएसपीपेक्षा जादा दरकेंद्र शासनाने काही राज्यात एमएसपीपेक्षा ३० ते ४० टक्के दर अधिक जाहीर केले आहेत.पण, सध्या कापसाला मिळत असलेला दर केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या एमसपीपेक्षा कमी आहे.दोन वर्षांपूर्वी कापसाचे भाव १३ हजारावर गेले होते.पण,यंदा सात ते साडेसात हजारांतच कापूस विक्री करावा लागतो आहे.

१९७२ ला होता ३२० रुपये भाव१९७२ मध्ये चांगल्या दर्जाच्या कापसाला ३२० रुपये प्रतिक्विंटल इतका भाव होता. त्यानंतर कापसाचा दर एक हजार रुपयापर्यंत होण्यासाठी १८ वर्षांचा कालावधी लागला. १९९१-९२ मध्ये प्रतिक्विंटल १,१३४ रुपयांचा भाव मिळाला होता. तर १९१९ मध्ये ५,५५० रुपये इतका होता. त्यानंतर तब्बल पाच वर्षांत मात्र, दोन हजार रुपये इतकेच दर वाढले. उत्पादन खर्च आणि मिळणारा भाव यातील निव्वळ नफा तुलनेने कमीच असल्यामुळे मराठवाड्यासह राज्यात शेतकरी आत्महत्यांचा आकडा वाढत असल्याचे कृषी तज्ज्ञांचे मत आहे.

टॅग्स :NandedनांदेडcottonकापूसGoldसोनंAgriculture Sectorशेती क्षेत्रMarketबाजार