शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
3
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
4
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
5
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
6
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
7
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
8
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
9
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
10
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
11
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
12
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
13
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
14
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
15
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
16
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
17
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
18
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
19
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
20
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ९४ केंद्रांवर कोविडचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:16 IST

मनपा क्षेत्रात मोडणाऱ्या ११ केंद्रांवर लसीचे डोस उपलब्ध करून दिले आहेत. या केंद्रात श्री गुरू गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. ...

मनपा क्षेत्रात मोडणाऱ्या ११ केंद्रांवर लसीचे डोस उपलब्ध करून दिले आहेत. या केंद्रात श्री गुरू गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, कौठा व सिडको या ८ केंद्रांवर कोविशिल्डचे प्रत्येकी १०० डोस उपलब्ध करून दिले आहेत, तर श्री गुरू गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, हैदरबाग, शिवाजीनगर, कौठा, जंगमवाडी, दशमेश, श्रावस्तीनगर (विजयनगर) व सिडको या ११ केंद्रांवर कोव्हॅक्सिनचे प्रत्येकी १०० डोस उपलब्ध केले आहेत.

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा, मुखेड, हदगाव, देगलूर, ग्रामीण रुग्णालय धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, नायगाव, उमरी, बारड, बिलोली व भोकर या १६ केंद्रांवर कोविशिल्डचे प्रत्येक केंद्रनिहाय १०० डोस उपलब्ध करून दिले आहेत. उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा, मुखेड, हदगाव, देगलूर, ग्रामीण रुग्णालय धर्माबाद, कंधार, लोहा, माहूर, मुदखेड, नायगाव, उमरी, बिलोली, भोकर या १३ केंद्रांवर कोव्हॅक्सिनचे प्रत्येकी १०० डोस, ग्रामीण रुग्णालय हिमायतनगर या केंद्रावर कोव्हॅक्सिनेच १२० डोस, ग्रामीण रुग्णालय मांडवी येथे कोव्हॅक्सिनचे ८०, ग्रामीण रुग्णालय बारड येथे कोव्हॅक्सिनचे ५० डोस उपलब्ध आहेत. जिल्ह्यातील सर्व ६७ प्राथमिक आरोग्य केंद्रांवर कोविशिल्डचे प्रत्येकी १०० डोस उपलब्ध केले आहेत.

जिल्ह्यात २८ मे पर्यंत एकूण ४ लाख २४ हजार ३२५ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले, तर २९ मे पर्यंत कोविड-१९ लसीचा साठा पुढीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे ३ लाख ८६ हजार ३३० डोस, कोव्हॅक्सिनचे १ लाख ८ हजार ८६० डोस याप्रमाणे एकूण ४ लाख ९५ हजार १९० डोस प्राप्त झाले आहेत.

हे सर्व डोस ४५ वर्षांवरील व्यक्तींसाठीच दुसऱ्या लसीकरणाला दिले आहेत. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्याच्या १२ ते १६ आठवडे म्हणजेच सुमारे ८४ दिवसांनंतर दुसरा डोस दिला जाईल. एखाद्या केंद्रांवर ४५ वर्षांवरील लाभार्थी नसेल तर तो डोस प्रथम लसीकरणासाठी वापरता येईल. कोव्हॅक्सिन ही लस ४५ वर्षांवरील लाभार्थ्यांच्या दुसऱ्या डोससाठीच दिली जाईल. मनपा कार्यक्षेत्रातील ४५ वर्षांवरील लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन या लसीच्या दुसऱ्या डोसकरिता cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे, तसेच Appointment Session Site Confirm झाल्यानंतरच लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. वय १८ ते ४४ वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांचे लसीकरण तात्पुरते थांबविण्यात आले आहे. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले.