अश्लील व्हिडीओ दाखवून शिक्षकाचे २0 विद्यार्थिनींसोबत अनैसर्गिक कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2020 02:57 IST2020-02-04T02:57:12+5:302020-02-04T02:57:59+5:30

अश्लील व्हिडीओ दाखवून सुमारे २0 चिमुकल्या विद्यार्थिनींसोबत शिक्षकाने अनैसर्गिक कृत्य केल्याची संतापजनक घटना सोमवारी उघडकीस आली.

Unnatural act with 20 student teachers by displaying pornographic videos | अश्लील व्हिडीओ दाखवून शिक्षकाचे २0 विद्यार्थिनींसोबत अनैसर्गिक कृत्य

अश्लील व्हिडीओ दाखवून शिक्षकाचे २0 विद्यार्थिनींसोबत अनैसर्गिक कृत्य

नांदेड : अश्लील व्हिडीओ दाखवून सुमारे २0 चिमुकल्या विद्यार्थिनींसोबत शिक्षकाने अनैसर्गिक कृत्य केल्याची संतापजनक घटना सोमवारी उघडकीस आली.घटनेनंतर पालकांनी शिक्षक स्वप्नील श्रृंगारे याला शाळेतच चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. पालकांनी शाळेला कुलूप ठोकले आहे.

शहराजवळील म्हाळज येथील प्रबोधन शाळेत चौथीपर्यंत वर्ग असून येथील शिक्षक स्वप्नील श्रृंगारे हा सहा महिन्यांपासून विद्यार्थिनींना मोबाईलमध्ये अश्लिल व्हिडीओ दाखवून अनैसर्गिक कृत्य करीत होता. याबाबत कुठे वाच्यता केल्यास शाळेच्या इमारतीवरून फेकण्याची तसेच शाळेतून काढून टाकण्याची धमकी देण्यात येत होती.

शाळेच्या वरच्या मजल्यावर विद्यार्थिनींना नेऊन तो हे घृष्णास्पद कृत्य करीत होता. श्रृंगारेच्या भीतीमुळे अनेक मुली शाळेत जाण्यास नकार देत होत्या. शनिवारी एका चिमुकलीला शाळेतून घरी आल्यानंतर उलट्या झाल्या़ त्यानंतर पालकांनी चौकशी केल्यानंतर प्रकार उघड झाला. शनिवारी रात्रीच पीडितेच्या आईने परिसरातील त्याच शाळेत जाणाऱ्या इतर मुलींच्या घरी जाऊन चौकशी केली़ त्यावेळी शिक्षकाने अनेक मुलींसोबत तसाच प्रकार केल्याचे पालकांच्या लक्षात आले.

संतप्त पालकांनी सोमवारी सकाळी शाळा गाठून मुख्याध्यापक वने यांना जाब विचारला. पालकांच्या प्रश्नावर श्रृंगारे हा उद्धटपणे उत्तरे देत होता. त्यामुळे संतप्त पालकांनी चोप देत त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्यावर बाललैंगिक अत्याचार व विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. नांदेड शहरापासून जवळच असलेल्या म्हाळज परिसरात रोज मजुरी करणाऱ्यांची संख्या अधिक आहे़ त्यांची मुले या शाळेत जातात.

दारूच्या नशेत आला होता शाळेत
श्रृंगारे चार वर्षांपासून या शाळेत आहे़ शाळेत जवळपास ७० मुले शिक्षण घेतात़ सोमवारी श्रृंगारे दारुच्या नशेत तर्रर होऊन शाळेत आला होता.

Web Title: Unnatural act with 20 student teachers by displaying pornographic videos