ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, महिला पोलीस व चिमुकली गंभीर जखमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 17:04 IST2018-10-16T17:03:42+5:302018-10-16T17:04:26+5:30

भोकर ते किनवट रस्त्यावर एका ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला

Two-wheeler killed, women police and chimukuli seriously injured in a truck crash | ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, महिला पोलीस व चिमुकली गंभीर जखमी 

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, महिला पोलीस व चिमुकली गंभीर जखमी 

नांदेड - भोकर ते किनवट रस्त्यावर एका ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी १२ वाजता घडली.अपघातात मृताची पत्नी महिला पोलीस कर्मचारी आणि त्यांची दीड वर्षाची मुलगी या गंभीर जखमी झाल्या आहेत. 

ज्योती सतीष जाधव या बारड येथील पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. आज त्या पती सतीश नामदेव जाधव आणि दीड वर्षाच्या मुलीसह दुचाकीवर ( एमएच २६ एएच १३१) नांदेड येथून हिमायतनगर तालुक्यातील भोनीतांडा येथे दसऱ्यानिमित्त जात होत्या. भोकर पासून जवळच असलेल्या सुधा प्रकल्पाजवळील किनवट रस्त्यावर समोरून येणाऱ्या ट्रकने (क्र. एम एच २६ ए डी २१४७) त्यांच्या दुचाकीस धडक दिली. यात ते तिघेही गंभीर जखमी झाले. त्यांना शहरातील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान सतिष जाधव यांचा मृत्यू झाला. ज्योती जाधव या गंभीर जखमी असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी नांदेडला पाठविण्यात आले. मुलगी आराध्या सध्या उपचार घेत आहे. 

Web Title: Two-wheeler killed, women police and chimukuli seriously injured in a truck crash