देवदर्शनासाठी जाणाऱ्या दोघा भाविकांचा अपघातात मृत्यू; भोकर फाटा येथील घटना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 11:25 IST2018-04-03T11:25:06+5:302018-04-03T11:25:06+5:30

सत्य गणपती दर्शनासाठी दुचाकीवरून जाणाऱ्या दोन भाविकांचा भोकर फाटा येथे अपघातात मृत्यू झाला. ही घटना आज आज पहाटे 5 वाजेच्या सुमारास घडली.

Two devotees dies in accident; The incident at Bhokar Phata | देवदर्शनासाठी जाणाऱ्या दोघा भाविकांचा अपघातात मृत्यू; भोकर फाटा येथील घटना 

देवदर्शनासाठी जाणाऱ्या दोघा भाविकांचा अपघातात मृत्यू; भोकर फाटा येथील घटना 

नांदेड : सत्य गणपती दर्शनासाठी दुचाकीवरून जाणाऱ्या दोन भाविकांचा भोकर फाटा येथे अपघातात मृत्यू झाला. ही घटना आज आज पहाटे 5 वाजेच्या सुमारास घडली. गोविंद धोंडीबा करडीले (20) व सुनील गंगाराम मस्के (19) असे मृतांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी कि, गोविंद आणि सुनील हे दोघे नागापुर येथील रहिवासी आहेत. आज पहाटे हे दोघे बाईकवरून (MH-26-BF-2007) नांदेड येथून चतुर्थी निमित्त सत्य गणपती दर्शनासाठी जात होते. पहाटे पाच वाजेच्या सुमारास आसना पुलाच्या कडेला भोकर फाटा येथे त्यांच्या बाईकची समोरून येणाऱ्या कंटेनर (MH-06-AC-6580) सोबत धडक झाली. यात बाईक कंटेनरच्या आत घुसली यामुळे दोघांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात ईतका भंयकर होता कि, रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. अपघातची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

Web Title: Two devotees dies in accident; The incident at Bhokar Phata