शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
2
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
3
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
4
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
5
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
6
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
7
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
8
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
9
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
10
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
11
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
12
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
13
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
14
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
15
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
16
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
17
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
18
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
19
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
20
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी

किल्ल्याकडे पर्यटकांनी फिरवली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 12:37 AM

राष्ट्रकुटकालीन ऐतिहासिक भुईकोट किल्ला संवर्धन, जतन व विकासासाठी कोट्यवधींचा निधी खर्च करत कायापालट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. परंतु २०१८ या वर्षात ९४ हजार ६७७ पर्यटकांनी आंनद लुटला. २०१७ साली ही संख्या १ लाख ३ हजार ३४५ होती.

ठळक मुद्देकोट्यवधींचा खर्च होऊनही असुविधा कायम, खंदकात काटेरी झाडांची वाढ

गंगाधर तोगरे ।कंधार : राष्ट्रकुटकालीन ऐतिहासिक भुईकोट किल्ला संवर्धन, जतन व विकासासाठी कोट्यवधींचा निधी खर्च करत कायापालट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. परंतु २०१८ या वर्षात ९४ हजार ६७७ पर्यटकांनी आंनद लुटला. २०१७ साली ही संख्या १ लाख ३ हजार ३४५ होती. ८ हजार ६६८ पर्यटकांची घट झाली आहे. विविध असुविधेमुळे हा पर्यटक घटण्याचा फटका बसल्याचे बोलले जात आहे.राष्ट्रकुटकालीन भुईकोट किल्ल्याला १२०० वर्षाचा वैभवशाली वारसा लाभला आहे. २४ एकरवरील विस्तीर्ण किल्ला आकर्षक असा आहे. आतील-बाहेरील बुरूज, राणी महाल, दरबार महल, राजा महल, लाल महल, राजाबाग स्वारगेट, बारूदखाना, अंबरखाना, भव्य अवजड तोफ, कैदखाना आदी पाहून पर्यटक, इतिहास प्रेमी अप्रतिम वास्तूचा आनंद लुटत असतात. काळाच्या ओघात अनेक वास्तुनांं तडे गेले,कांहीचे भग्नावशेष झाले. तरीही मराठवाड्यात नाही तर राज्यात या किल्ल्याचे महत्त्व कायम नजरेत भरणारे आहे.म्हणून पर्यटकांची वर्षभर मोठी वर्दळ असते. किल्ला विकासासाठी लोकमत गत दीड दशकापेक्षा अधिक काळापासून शासन,पुरातत्व विभाग आदीचे लक्ष वेधत आले आहे. ५ वर्षापूर्वी ३ कोटी ४० लाख ७८ हजाराचा निधी मंजूर झाला. त्यात सुरक्षा कक्ष,तिकीट घर,पर्यटक आगमन, सुविधा केंद्र, पादचारी रस्ता, प्रसाधनगृह, कारंजे पुल, फुड प्लाझा, वाहनतळ, कुंपनभिंत आदी कामाचा समावेश होता. मोठ्या प्रमाणात कामे झाली. परंतु त्याचे उद्घाटन व वापर होण्यापूर्वीच ते जुने होण्याच्या मार्गावर आहेत.मागील वर्षी भुईकोट किल्ला संवर्धन व दुरूस्ती करता पावणे पाच कोटीच्या कामातून अनेक कामे झाली. चूना व वीट बांधकाम, लाकडी काम, दगडी बांधकामाने कांही वास्तुला झळाळी आली. या कामाने पर्यटकात मोठी वाढ होईल. अशा चर्चेने जोर धरला. परंतु २०१७ च्या तुलनेत घट झाली आहे.२०१७ मध्ये १लाख ३ हजार ३४५ पर्यटकांनी भेटीचा आंनद लुटला. आणि २०१८ सालात ९४ हजार ६७७ संख्या राहीली. ८ हजार ६६८ संख्या घटली. हे असे कसे झाले. यावर असुविधा विषयी तर्कवितर्क काढले जात आहेत.किल्ल्यालगत असलेल्या खंदकात काटेरी झाडाची बेसुमार वाढ झाली आहे. त्यामुळे वास्तु सौंदर्य झाकोळले आहे. सुरक्षा बेभरोशाची असून पोलीस चौकी नाही. माहिती फलक नावालाच असून त्यावरील माहितीचा बोध होणे कठीण झाले आहे.खंदक पाण्या अभावी कोरडा आहे. मुर्ती शिल्पे उघडयावर ऊन, पावसाचे चटके सहन करत आहेत.वस्तुसंग्रहालय सोय नाही, बगीचा नाही, पिण्याचे पाणी नाही. विशेष म्हणजे गाईड नसल्याने किल्ला माहीती पर्यटकांना योग्य मिळत नाही. त्यातच कर्मचाऱ्यांची मोठी वाणवा आहे.८ हजारांवर पर्यटकांची घट२०१८ या वर्षात ९४ हजार ६७७ पर्यटकांनी भूईकोट किल्ल्यास भेट देवून आनंद लुटला़ २०१७ मध्ये ही संख्या १ लाख ३ हजार ३४५ होती़ ८ हजार ६६८ पर्यटकांची घट झाली आहे़ मागील वर्षी भूईकोट किल्ला संवर्धन व दुरूस्तीसाठी पावने पाच कोटीच्या कामातून अनेक कामे करण्यात आली आहेत़

टॅग्स :NandedनांदेडFortगडtourismपर्यटन