नांदेड येथे गोदावरी पात्रात बुडून तीन मुलांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 03:50 PM2018-08-04T15:50:28+5:302018-08-04T15:51:25+5:30

पोहण्यासाठी गोदावरीच्या पात्रात उतरलेल्या तिघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली.

Three children die drowning in Godavari area at Nanded | नांदेड येथे गोदावरी पात्रात बुडून तीन मुलांचा मृत्यू

नांदेड येथे गोदावरी पात्रात बुडून तीन मुलांचा मृत्यू

Next

नांदेड : पोहण्यासाठी गोदावरीच्या पात्रात उतरलेल्या तिघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली. तिन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. 

मृतामधील शुभम जगताप व शुभम जाधव हे दोघे दहावीत तर आनंद केंद्रे हा नवव्या वर्गात शिकतो. शनिवारी दुपारी जुना मोंढा परिसरात गोदावरीच्या पात्रात उतरले होते. परंतु पोहता येत नसल्याने तिघेही बुडू लागली. यावेळी नदीकिनारी असलेल्या नागरिकांनी त्यांच्या बचावासाठी आरडाओरड केली. परंतु तोपर्यंत तिघांचाही मृत्यू झाला होता. गोदावरी जीवरक्षक दलाच्या जवानांनी तिघांचेही मृतदेह बाहेर काढले आहेत. 

Web Title: Three children die drowning in Godavari area at Nanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.