शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
3
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
4
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
5
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
6
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
7
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
8
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
9
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
10
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
11
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
12
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
13
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
14
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
15
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
16
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
17
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
18
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
19
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

सगरोळीतील ‘त्या’ कुटुंबाना निवडणूकीचा पत्ताही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 00:27 IST

एका बाजूला शासन मतदान वाढीसाठी लाखो रुपये खर्च करीत आहे तर दुसरीकडे येथे रोजी-रोटीसाठी आलेली ३५ ते ४० कुटूंबे निवडणूकीपासून अनभिज्ञ असल्याचे दिसून आले.

ठळक मुद्देआदिवासींची व्यथा: टिचभर पोटासाठी संघर्ष

सगरोळी : एका बाजूला शासन मतदान वाढीसाठी लाखो रुपये खर्च करीत आहे तर दुसरीकडे येथे रोजी-रोटीसाठी आलेली ३५ ते ४० कुटूंबे निवडणूकीपासून अनभिज्ञ असल्याचे दिसून आले.सगरोळी परिसरात गेल्या तीन-चार वर्षापासून ये-जा करणारे रायगड जिल्ह्यातील खोपोली, रोहा, महाड तालुक्यातील भालगुल, सुधाकर पल्ली, परळी,जाबुपाडा,गणपत पल्ली तसेच पेण, आलिबाग व अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील लाकडवाडी येथिल आदिवासी जमातीतील गोपाळ वाघमारे, ताराबाई, बबन वाघमारे,जनाबाई बबन, पिंटू विकास, रेणुका पिंटू, सुनील घोगरकर, कविता घोगरकर, हरीचंद जाधव, बाळू, लालु पवार गंगाधर, मोहन अशी ३५ ते ४० कुटुंबे सगरोळी बोळेगावच्या पूर्व दिशेला मांजरा नदीच्या काठेवर तसेच लघूळ शिवारात पाल ठोकून वास्तव्यास आहेत. दिवसराञ किनाऱ्यावर असलेली काटेरी बाभूळ खोडमुळासकट तोडून जाळून त्यापासून कोळसा तयार करणे, आसपासच्या शहरात मागणी झाली तर विकणे नाहीतर पुणे, नगर, मुंबई या ठिकाणी गुत्तेदारामार्फत पाठवून यातूनच मिळणाºया पैशावर त्यांची उपजिविका चालते. एक मोठे बारदान थैली भरून १२० रुपये गुत्तेदार यांना देतो. सध्या या परिसरात वास्तव्यास तीस ते चाळीस कुटुंबे असल्याचे मुकादम म्हणून काम पहाणारे लालु पवार व जाधव यांनी सांगितले. सण, वार, उत्सव निवडणूकातही ही कुटूंबे कामावरच असल्याने ते आपला मतदानाचा हक्क बजावू शकले नाहित. विशेष म्हणजे जंगल शिवारात रहात असल्याने व गावगाड्याशी संबंध येत नसल्याने तसेच त्यांच्याकडे ना टी.व्ही.ना मोबाईल़ त्यामुळे निवडणूका व मतदान कधी आले आणि कधी झाले हेही या कुटूंबियांना माहित नसल्याचे दिसून आले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnanded-pcनांदेडVotingमतदान