शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
3
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
4
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
5
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
6
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
7
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
8
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
9
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
10
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
11
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
12
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
13
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
14
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
15
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
16
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
17
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
18
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
19
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
20
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
Daily Top 2Weekly Top 5

एसटी कामगार संघटना कार्यालयाचे टाळे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 00:47 IST

राज्य परिवहन महामंडळाच्या नांदेड विभागातील मान्यताप्राप्त संघटनेच्या कार्यालयास प्रशासनाने १५ सप्टेंबर २०१८ रोजी टाळे ठोकले होते़ संघटना कार्यालयाच्या नियमित भाडे भरणा केलेला असतानाही द्वेषातून व पूर्वग्रहदूषित हेतूने संघटना कार्यालयास टाळे ठोकण्यात आले.

ठळक मुद्देन्यायालयाचा दिलासा

नांदेड : राज्य परिवहन महामंडळाच्या नांदेड विभागातील मान्यताप्राप्त संघटनेच्या कार्यालयास प्रशासनाने १५ सप्टेंबर २०१८ रोजी टाळे ठोकले होते़ संघटना कार्यालयाच्या नियमित भाडे भरणा केलेला असतानाही द्वेषातून व पूर्वग्रहदूषित हेतूने संघटना कार्यालयास टाळे ठोकण्यात आले. याबाबत औद्योगिक न्यायालयाने हे टाळे उघडण्याचे आदेश दिले आहेत़नांदेड विभागातील मान्यताप्राप्त संघटनेच्या संघटना कार्यालयास प्रशासनाने कुठलीही पूर्वकल्पना न देता १५ सप्टेंबर २०१८ रोजी टाळे ठोकले होते़ सदर संघटना कार्यालयाच्या नियमित भाडे भरणा केलेला असतानाही संघटना द्वेषातून व पूर्वग्रहदूषित हेतूने संघटना कार्यालयास टाळे ठोकण्यात आल्याचा आरोप करीत मान्यता प्राप्त संघटनेनी आंदोलनही छेडले़ याबाबत प्रशासनाला विचारणा केली असता नेहमीप्रमाणे उडवाउडवीची उत्तरे देण्याचे काम प्रशासनामार्फत करण्यात आले. शेवटी याबाबत संघटनेने औद्योगिक न्यायालयात धाव घेऊन महामंडळात चाललेले नियमाची पायमल्ली व प्रशासनाचे आडमुठे धोरण मा.न्यायालयाच्या निदर्शनास आणले. संघटना कार्यालय कशा नियमबाह्य पद्धतीने ताब्यात घेतले या बाबी स्पष्ट केल्या.प्रशासनाच्या या एककल्ली कारभारावर ताशेरे ओढत संघटना कार्यालय संघटनेच्या ताब्यात देण्याचे आदेश औद्योगिक न्यायालयाने प्रशासनाला दिले. त्या आदेशान्वये आज दिनांक २८ मार्च २०१९ रोजी नांदेड विभागाचे संघटना कार्यालय संघटनेच्या ताब्यात देण्यात आले.यावेळी केंद्रीय उपाध्यक्षा शीला संजय नाईकवाडे, विभागीय अध्यक्ष एम़ बी़ बोर्डे, विभागीय सचिव विनोद पांचाळ, विभागीय कार्याध्यक्ष संजय मादास यांच्यासह मन्मथ स्वामी, चंद्रकांत पांचाळ, गंगाधर मोगले, सारीपुत जाधव, महंमद गौस, ताजोद्दीन, भगवान चव्हाण, काजी, फारुकी, सुरेश माचनवाड, शिरेवार, गवळी, डी़ एऩ कोंढे, सविता जमदाडे, पद्मश्री राजे, सुकेशनी कुलदिपकर या निर्भया समिती सदस्य उपस्थित होत्या़

  • मान्यताप्राप्त कामगार संघटनेच्या सभासदांनी जल्लोषात संघटना कार्यालय ताब्यात घेतले. फटाके वाजवून, गुलाल उधळून, पेढे वाटून, ढोल ताशाच्या गजरात संघटना कार्यालयात प्रवेश करण्यात आला. यावेळी नांदेडात विभागातील सर्व आगारातील कामगार सभासद, पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते़ दरम्यान, संघटनेच्या केंद्रीय उपाध्यक्षा शीला नाईकवाडे यांनी उपस्थित पदाधिकारी, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले़
टॅग्स :NandedनांदेडCourtन्यायालय